अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातील प्रत्येक गोष्टींकडे राज्याच्या नाही तर देशाच्या नजरा असतात. पुणेकरांच्या आवडीनिवडीपासून पुणेरी पाट्यांपर्यंत सर्वच गोष्टी चांगल्या व्हायरल होत असतात. यामुळेच पुणे शहरातील खाद्य संस्कृती प्रमाणे पुणेकरांना कोणते पेय अन् मद्य आवडते याची चर्चा होते. आता राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाने दिलेल्या आकडेवारीवरुन पुणेकरांची पसंत समोर आली आहे. पुणे विभागाने १ वर्षात मद्य विक्रीच्या माध्यमातून राज्याला दिला २२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल दिला आहे. पुणे विभागाची ही कामगिरी मागील वर्षापेक्षा उजवी ठरली आहे.
कोणते पेय पुणेकरांनी जास्त रिचवले
पुणेकरांची पसंती बियरला मिळाली आहे. पुण्यात बियरच्या विक्रीत तब्बल 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात बियर विक्री मध्ये 51 टक्के वाढ तर वाईन विक्रीत 31 टक्क्याने वाढ झाली आहे.
देशी मद्य, विदेशी मद्याची विक्री वाढली
गेल्या १ वर्षात देशी मद्याच्या विक्रीत १५ टक्के वाढ तर विदेशी मद्य विक्रीत देखील २३ टक्के वाढ झाली. राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाने १ वर्षात मद्य विक्रीच्या माध्यमातून राज्याला दिला २२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवून दिला आहे. मागच्या दोन वर्षातील सगळ्यात जास्त बियरची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात मद्यशौकीनांची बियरला पसंती असल्याचे दिसून येत आहे.
या माध्यमातून निधी
अवैधरित्या मद्य विक्री तसेच परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्ह्यांमध्ये ७८ कोटी ७२ लाख ८५हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी २९४७ जणांवर अवैधरित्या मद्य विक्री केली गेली आहे. तसेच त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली गेली. गोव्यातून सीमा शुल्क चुकवून मद्य तस्करी करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहिमेअंतर्गत ४२ लोकांवर कारवाई करण्यात आली.
पुणे शहर ज्या प्रमाणे विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, तशीच पुणे शहरात मद्य संस्कृती आता रुजायला लागली असल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
हे ही वाचा
Good News : मुंबई- पुणे दरम्यान अंतर कमी करणारी बातमी, कधी सुरु होणार हा प्रकल्प
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, १६० कोटींचा कसा आहे प्रकल्प