महाराष्ट्र निवडणूक 2024: पुण्यात धडक कारवाई, बेकायदेशीरपणे घेऊन जाणारी लाखोंची रोकड जप्त
election code of conduct cash limit: पुणे शहरात शनिवार वाड्याजवळ एका व्यक्तीकडून ३ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले. २२ एप्रिल रोजी दुपारी पथकाने ही कारवाई केली. रोकड रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला त्याबाबत काहीच स्पष्टीकरण देता आले नाही. यामुळे ती रक्कम जप्त करुन कोषागार कार्यालयात जमा केली.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशभरात सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर बेकायदेशीर रक्कम बाळगण्यावर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीर रक्कम नेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये 25 लाखांची रोकड जप्त करण्यात आली मंगळवारी सव्वा दहाच्या सुमारास वाकड हद्दीत ही कारवाई करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीत एका वाहनात ही रक्कम आढळली. पुणे शहरात शनिवारवाडाजवळ ३ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले.
कशी करण्यात आली कारवाई
पिंपर चिंचवडमध्ये निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि पोलिसांच्या पथकाची गस्त सुरु होती. गस्त सुरु असताना वाहनांची तपासणी केली जात होती. वाकड हद्दीत एका वाहनाची तपासणी करताना रक्कम आढळून आली. त्यासंदर्भाच विचारणा केल्यावर संबंधिताना उत्तर देता आले नाही. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ही रक्कम आढळल्याने पथकाने ती जप्त केली. ज्याच्याकडून रक्कम जप्त करण्यात आली ते संबंधित व्यक्ती स्थानिक असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
आयकर विभाग करणार तपास
लोकसभा निवडणूक काळात वाकडमध्ये सापडलेली रक्कम पथकाने जप्त करुन कोषागार कार्यालयात जमा केली आहे. या प्रकरणाचा तपास आयकर विभाग करणार आहे. त्यावेळी ही रक्कम एखाद्या उमेदवाराची आहे का? असेल तर तो कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे? की ही रक्कम त्या व्यक्तीची स्वतःची आहे का? या प्रश्नांची उत्तरे आयकर विभागाच्या तपासात निष्पन्न होणार आहे.
पुणे शहरात मिळाली रक्कम
पुणे शहरात शनिवार वाड्याजवळ एका व्यक्तीकडून ३ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले. २२ एप्रिल रोजी दुपारी पथकाने ही कारवाई केली. रोकड रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला त्याबाबत काहीच स्पष्टीकरण देता आले नाही. यामुळे ती रक्कम जप्त करुन कोषागार कार्यालयात जमा केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली.