Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी पुन्हा जिकलं मन; लोकसभेतील दमदार विजयानंतर गाठले अजितदादांचे घर; चर्चांना पुन्हा आले उधाण

Supriya Sule Ajit Pawar Home : लोकसभेपूर्वी राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली. अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी उभी शकलं पडली. पण नात्यातील वीण अजून ही घट्ट असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. आता ही सुप्रिया सुळे यांनी कृतीतून तेच दाखवून दिले.

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी पुन्हा जिकलं मन; लोकसभेतील दमदार विजयानंतर गाठले अजितदादांचे घर; चर्चांना पुन्हा आले उधाण
सुप्रिया सुळे काकींच्या भेटीला
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 11:17 AM

लोकसभा निकालापूर्वी राज्यात मोठे भूकंप झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर पवार कुटुंबातच उभी फुट पडली. त्यातच लोकसभा निवडणुकीत बारामतमीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. राज्यातील इतर घराण्यात जसा मनमुटाव झाला. कमालीचे शत्रुत्व आले. तसा प्रकार पवार कुटुंबियात दिसेल असे वाटत असताना लोकसभा प्रचारा दरम्यान आणि निकालानंतर सुखद धक्के बसले. सुप्रिया सुळे यांनी दमदार विजयानंतर बारामतीत येताच सर्वात अगोदर अजितदादांचे घर गाठले.

लोकसभेत एकमेकांविरुद्ध

बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आमने-सामने होत्या. ही लढत चुरशीची होणार हे ठरलेले होते. बारामतीत पवारांना जोराचा धक्का देण्यासाठी महायुतीने सर्व पणाला लावले होते. पवारांचा बालेकिल्ला ढासळण्यासाठी सर्व प्रयत्न अपयशी ठरले. सुप्रिया सुळे मोठ्या फरकाने या मतदारसंघात विजयी झाल्या. त्यांनी भावजयी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला.

हे सुद्धा वाचा

बारामती येताच अगोदर दादांच्या घरी

सुप्रिया सुळे या निवडून येताच पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर आल्या. बारामतीत त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पण त्यांनी आल्या आल्या अगोदर त्यांनी काठेवाडी गाठलं. अजित पवार यांच्या आई आणि त्यांच्या काकी आशाताई पवार यांची भेट घेतली. त्यांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यांच्या या कृतीने सर्वांचीच मनं जिंकली. तर राजकारणात विरोध असला तरी त्याच्यापुढे नात्याचा दोर मजबूत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

यापूर्वी पण सुखद धक्का

लोकसभेच्या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची गळाभेट झाली होती. त्यावेळी सर्वांसाठी हा सुखद धक्का होता. बारामतीजवळ जळोची गावात कालेश्वरी मंदिर आहे. या ठिकाणी हे सूखद चित्र उभ्या देशाने पाहिले होते. नणंद आणि भावजयी यांची गळाभेट झाली होती. या दोघी मंदिरात आल्या असता त्यांची नजरानजर झाली. त्यांनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या. गळाभेट घेतली. दोघींनी एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....