lokmanya tilak award : लोकमान्य टिळक पुरस्काराने आतापर्यंत कोणाचा झालाय गौरव

PM Modi Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आतापर्यंत ४० जणांना हा पुरस्कार देण्यात आता. नरेंद्र मोदी यांना ४१ हा पुरस्कार मिळाला आहे.

lokmanya tilak award : लोकमान्य टिळक पुरस्काराने आतापर्यंत कोणाचा झालाय गौरव
lokmanya tilak and narendra modi
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 12:35 PM

पुणे | 1 ऑगस्ट 2023 : ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देश, विदेशात भारताची प्रतिमा उंचवलेली आहे. तसेच आत्मनिर्भर भारत योजना राबवून त्यांनी देशाला स्वावलंबी केले. यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष जयंत टिळक यांनी दिली. यापूर्वी ४० जणांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरव केला गेला आहे.

कधी सुरु झाला पुरस्कार

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात १ ऑगस्ट १९८३ मध्ये झाली. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार देण्यात येतो. पहिला पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना दिला गेला. आतापर्यंत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi), डॉ मनमोहन सिंग (Dr Manmohan Singh), अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनाही हा पुरस्कार दिला गेला आहे. तसेच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) आणि शंकर दयाळ शर्मा यांचाही हा पुसस्कार देऊन गौरव केला गेला आहे. माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना हा पुरस्कार दिला आहे. खान अब्दुल गफार खान यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यासोबत डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांनाही हा पुरस्कार दिला आहे.

हे ठरले मानकरी

प्रा. एम. एस. स्वामिनाथन यांनी केलेल्या हरित क्रांतीमुळे तर दुग्ध क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांना मिळाला आहे. रेल्वे मॅन डॉ. ई. श्रीधरन यांचाही या पुरस्कारने गौरव झाला आहे. संगणक क्षेत्रात केलेल्या कमगिरीमुळे डॉ. विजय भटकर, सॅम पित्रोदा यांचा गौरव झाला आहे. उद्योगात राहुल बजाज, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. सायरस पूनावाला, बाबा कल्याणी यांनी बजावलेल्या कामगिरीचा गौरव केला.

हे सुद्धा वाचा

आणखी कोण आहेत मानकरी

शरद पवार, डॉ. आर. चिदम्बरम यांचाही या पुरस्कारने गौरव झाला आहे. त्याचबरोबर गोदावरी परुळेकर, श्रीपाद अमृत डांगे, अच्युतराव पटवर्धन, सुधाताई जोशी, मधु लिमये, बाळासाहेब देवरस, डॉ. रा. ना. दांडेकर, रामोजी राव, जी. माधवन नायर, डॉ. ए. सिवाथानू पिल्लई, मॉन्टेकसिंग अहलुवालिया, प्रणब मुखर्जी, शीला दीक्षित, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. अविनाश चंदेर, सुबय्या अरुणन, शरद पवार, आचार्य बाळकृष्ण, डॉ. के. सिवन, , सोनम वांगचूक, आणि डॉ. टेस्सी थॉमस यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.