पुणे म्हाडाच्या वतीने 4222 घरांसाठी सात जानेवारीला सोडत; अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ
म्हाडाच्या घरासाठी ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. लवकरच त्यांचे घराचे स्वन्प पुर्ण होणार आहे. पुणे म्हाडाच्या वतीने 4 हजार 222 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. 4 हजार 222 घरांसाठी तब्बल 64 हजार 715 लोकांनी अर्ज केले आहे. सात जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
पुणे : म्हाडाच्या घरासाठी ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. लवकरच त्यांचे घराचे स्वन्प पुर्ण होणार आहे. पुणे म्हाडाच्या वतीने 4 हजार 222 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. 4 हजार 222 घरांसाठी तब्बल 64 हजार 715 लोकांनी अर्ज केले आहे. सात जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. जिल्हा परिषद इमारत येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांचं लक्ष येत्या सात जानेवारीकडे लागले आहे.
20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत 1399 सदनिका
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ ‘म्हाडा’ तर्फे येत्या सात जेनेवारीला 4 हजार 222 घरांसाठी सोडत होणार आहे. ही आठवी ऑनलाईन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनतील 2823 सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत 1399 सदनिका असे मिळून एकूण 4 हजार 222 घरांसाठी येत्या सात जानेवारीला सोडत होणार आहे. या 4 हजार 222 घरांसाठी अर्ज दाखल करण्याचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्त झाला होता. आता येत्या सात जानेवारीला सोडत देखील अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिली.
कोरोना काळात सर्वसामान्यांना दिलासा
दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचे संकट होते. अर्थवव्यवस्था ठप्प झाली होती. अनेकांनी रोजगार गमावले होते. मात्र तरी देखील अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न असते. ही संधी त्यांना म्हाडाच्या वतीने मिळत आहे. पुणे म्हाडाने येत्या सात जानेवारील रोजी 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. यासाठी तब्बल 64 हजार 715 जणांनी अर्ज केले होते. या सोडतीमध्ये ज्यांचे नाव जाहीर होईल, त्या भाग्यवान विजेत्यांना लवकरच म्हाडाच्या वतीने घर उपलब्ध होईल अशी माहिती माने यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या
घोटाळेबाज पुरस्काराची घोषणा करून भाजपच्या कोपरखळ्या, राजेश टोपे घोटाळेरत्न-भाजप