Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कमी पाऊस, शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणार आयएमडीचा अंदाज

IMD Weather forecast : राज्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. परंतु ऑगस्ट महिन्यापासून राज्यात पाऊस नाही. पहिला आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यापुढेही चिंता निर्माण करणारी परिस्थिती असणार आहे.

Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कमी पाऊस, शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणार आयएमडीचा अंदाज
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 10:12 AM

पुणे | 10 ऑगस्ट 2023 : राज्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली आहे. राज्यात मान्सून यंदा उशीरा दाखल झाला. परंतु त्यानंतर जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात तर अतिवृष्टी झाली. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी झाला. पुढील काही दिवस राज्यात पाऊस नसेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यात कुठे पावसाचा अलर्ट दिला नाही.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज

राज्यात गेल्या 7 दिवसांपासून जवळपास पाऊस पडला नाही. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे, यामुळे शेतीसाठी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे आणखी काही दिवस पाऊस नसले, अशी माहिती हवामान विभागचे पुणे विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच राज्यात पुढील चार दिवसांसाठी कुठेही पावसाचा अलर्ट दिलेला नाही.

हे सुद्धा वाचा

ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. १ ते ८ ऑगस्ट दरम्यान राज्यात कुठेही पावसाने सरासरी गाठली नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या पावसाने दडी मारली असल्यामुळे शेतकरी मशागतीची कामे करत आहे. परंतु पुढील काही दिवस पाऊस नसणार नाही. यामुळे शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणारी परिस्थिती आहे.

राज्यात काय आहे परिस्थिती

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पावसाने दांडी मारलीय. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे पीके धोक्यात आली आहेत. शेतकरी ठिबकचा वापर करून आपल्या पिकांना पाणी देत आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम आणि मालेगाव या तीन तालुक्यांमधील पाणी प्रकल्पांत अल्पसाठा आहे. यंदाचा पावसाळा अर्धा उलटला असताना सरासरी पेक्षा केवळ 36 टक्केच जलसाठा झाला आहे. धुळे जिल्ह्यात सरासरी फक्त ७४ टक्के पाऊस झाला आहे. पाऊस नसल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

कृषी विभागाचे आवाहन

परभणी जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात अनेक भागात सोयाबीन पिकावर रोग पडला आहे. सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पन्नात 15 ते 75 टक्केपर्यंत घट होऊ शकते. शेतकऱ्यांनी वेळीच या रोगाला ओळखून पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून रोगाचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.