Madhya Pradesh Robbers case| जखमी पोलीस कर्मचारी शुभम कदम यांची पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी घेतली भेट
मध्य प्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन मोटारीतून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ उर्से टोल नाक्यावर सापळा रचला. या दरम्यान सकाळी साडेअकरा बाराच्या सुमारास संशयित वाहनं टोल नाक्यावरून पुढे सरकत होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली.
पिंपरी – मध्य प्रदेशातून आलेल्या दरोडेखोरांना उर्से टोल नाका इथं पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवडमधील पोलिसांवर हल्ला केल्याची घटना काल (गुरुवारी) घडली आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी शुभम कदम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी कर्मचारी शुभम कदम यांची पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी रुग्णालयात जात तब्येतीची चौकशी केली आहे. दरम्यान उर्से टोल नाक्यावर पोलिसांवर हल्ला केलेल्या दरोडेखोरांपैकी 9 जण पोलिसांच्या ताब्यात असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे. उर्से टोल नाक्यावर दरोडेखोर येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिस त्यांना पकडण्यासाठी गेले असता दरोडेखोरोनी त्यांच्यावर गाडी घातली होती.
अशी घडली घटना मध्य प्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन मोटारीतून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ उर्से टोल नाक्यावर सापळा रचला. या दरम्यान सकाळी साडेअकरा बाराच्या सुमारास संशयित वाहनं टोल नाक्यावरून पुढे सरकत होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली. मात्र, तरी देखील पोलिसांनी जीवाची परवा न करता 9 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
14 पिस्तुल आणि 8 जिवंत काडतूस पोलिसांनीकेली जप्त मध्य प्रदेशातील एका टोळीने पिंपरी चिंचवड शहर परिसरात विक्रीसाठी आणलेले 14 पिस्तुल आणि 8 जिवंत काडतूस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने हस्तगत केले आहेत. पिंपरी चिंचवडमधील वडमुखवाडीमध्ये काही जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने परिसरात सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून दुचाकी, पिस्तुल, जिवंत काडतूसे, तीन मोबाईल फोन, मिरची पूड, नायलॉन दोरी असा माल हस्तगत केला आहे.
Video | बीडमध्ये पेट्रोल भरण्यासाठी भाडे तत्वावर 10 रुपयात मिळतो हेल्मेट
Video | नागपुरात चट मंगनी, पट ब्याह! दहा मिनिटांत नोंदणी; अर्ध्या तासात लग्न, कसे ते वाचा