Maghi Ganesh Utsav : पुणेकरांनो, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील रस्ता उद्या बंद, वाहतूक मार्ग बदलले

| Updated on: Jan 24, 2023 | 9:44 PM

गणेश जयंतीच्या (Ganesh Jayanti) निमित्ताने पुण्यात उद्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील (Dagdusheth Halwai Ganpati Temple) रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतली आहे.

Maghi Ganesh Utsav : पुणेकरांनो, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील रस्ता उद्या बंद, वाहतूक मार्ग बदलले
Follow us on

पुणे : राज्यभरात सध्या माघी गणेशोत्सवाचा (Maghi Ganesh Utsav) उत्साह आहे. या गणेशोत्सवातील उद्या महत्त्वाचा दिवस आहे. कारण उद्या गणेश जयंती आहे. त्यामुळे अनेक गणपती मंदिरांमध्ये भक्तीमय आणि उत्साहाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे गणेश जयंतीच्या (Ganesh Jayanti) निमित्ताने पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील (Dagdusheth Halwai Ganpati Temple) रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. गणेश जयंतीच्या निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी खबरदारी म्हणून उद्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दगडूशेठ हलवाई मंदिराच्या समोरील शिवाजी रस्ता उद्या सकाळी सहा वाजेपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या रस्त्याने सोडलं जाणार आहे. जड वाहतूक, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे.

दगडूशेठ हलवाई मंदिराचं डेकोरेश आणि भाविकांची होणारी गर्दी हे खरंतर पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिराचं समीकरणच आहे. प्रत्येक सणाला दगडूशेठ हलवाई मंदिराला आकर्षक सजावट केली जाते. सजावटीचं काम सुरु झालेलं आहे. पण शिवाजी रस्ता भाविकांसाठी बंद असणार आहे. जोपर्यंत गर्दी कमी होत नाही तोपर्यंत शिवाजी रस्ता बंद असणार आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील शिवाजी रस्ता सकाळपासून गर्दी संपेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलीय.

मुंबईतही उद्या रथयात्रा

दरम्यान, उद्या मुंबईतही रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत दादर येथे प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक गणपती (Siddhivinayak Temple) मंदिर आहे. या गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा केला जातोय. गणपती मंदिराच्या न्यास व्यवस्थापन समितीकडून महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. गणपती मंदिराकडून उद्या मुंबईत भव्य रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या रथयात्रेत हजारो भाविकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे भाविकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तसेच मुंबईत काही कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी देखील ही महत्त्वाची बातमी आहे.

“दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव 22 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येतोय. येत्या बुधवारी म्हणजेच उद्या 25 जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता श्रीसिद्धिविनायकाची रथयात्रा गणपती मंदिरातून निघणार आहे”, असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

ही रथयात्रा श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर येथून एस. केत. बोले मार्ग, त्यानंतर पुढे गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग-काशीनाथ घाणेकर मार्ग, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी मंदिर, वीर सावरकर मार्ग अशी फिरुन परत सिद्धिविनायक गणपती मंदिरात पोहोचेल.