आघाडी सरकार लवकरच पडेल, आठवीतला मुलगाही सांगेल; चंद्रकांत पाटील यांचं पुन्हा भाकीत
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. (maha vikas aghadi government will collapse soon, says chandrakant patil)
पंढरपूर: आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यानंतर आज विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केलेला असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकार पडणार असल्याचं भाकीत केलं आहे. ठाकरे सरकार पडणारच, हे इयत्ता आठवीतला मुलगाही सांगू शकेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. (maha vikas aghadi government will collapse soon, says chandrakant patil)
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका करतानाच सरकार पडण्याचं भाकीतही केलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सरकारकडे काहीच नियोजन नाही, प्लानिंग नाही. सरकारमध्ये विल पॉवर कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. इयत्ता आठवीतला मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल. हे सरकार लवकरच पडले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असं पाटील म्हणाले.
पॅकेज फसवं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेलं पॅकेज फसवं आहे. या सरकारने दीड हजार रुपये मदत देऊन गोरगरिबांची चेष्टा केली आहे. दीड हजारात कुटुंबाचा खर्च चालतो का? असा सवाल त्यांनी केला. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. हे आम्ही आधीपासून सांगतोय. कोरोनाची साखळी तोडलीच पाहिजे. परंतु, गडी, हमाल, माथाडी कामगार, व्यापारी हा वर्ग मोठा आहे. त्याचा या पॅकेजमध्ये विचार करण्यात आलेला नाही, असंही ते म्हणाले.
आरोग्य सुविधेबाबत प्लानिंग नाही
राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा रद्द होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार केलेला दिसत नाही, असंही ते म्हणाले. ऑक्सिजन नसल्यामुळे डॉक्टर रडले. सरकारने आरोग्य यंत्रणेचं काहीच प्लानिंग केलं नाही. आम्ही आमदारांच्या विकास निधीतले चार कोटी काढून दोन कोटी रुपये सरकारला द्यायला हवे होते. तेही केलं नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे, असं ते म्हणाले.
दोषींवर कारवाई होणारच
यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयकडून होत असलेल्या चौकशीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सीबीआय चौकशीतून जे दोषी आहेत, ते उघड होईल. दोषी असणाऱ्यांवर एफआयआर नोंदवला जाईल. तसेच त्यांच्यावर अटकेपासून ते सर्व कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. (maha vikas aghadi government will collapse soon, says chandrakant patil)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 14 April 2021 https://t.co/1CPUL9ycCe
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2021
संबंधित बातम्या:
पृथ्वीराज चव्हाण आधी म्हणाले, खात्यावर पैसे टाका, मग लॉकडाऊन करा, आता उद्धव ठाकरेंवर मोठं भाष्य
बदलीमुळे नाराजी, कोल्हापुरात पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
VIDEO: मी कच्च्या गुरुचा चेला नाही आणि धनंजय मुंडेंनी मध्येच भाषण थांबवले!
(maha vikas aghadi government will collapse soon, says chandrakant patil)