नको नॉनवेज गुरुवारी, त्यामुळे एक दिवस आधीच साजरी झाली गटारी! तब्बल 2500 बोकड, 700 टन चिकन, 50 टन मासे, समदं ओक्के मदी

मटण 680 ते 700 रुपये किलो दराने बुधवारी विकले जात होते.

नको नॉनवेज गुरुवारी, त्यामुळे एक दिवस आधीच साजरी झाली गटारी! तब्बल 2500 बोकड, 700 टन चिकन, 50 टन मासे, समदं ओक्के मदी
कोंबडी वडेImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 7:10 AM

पुणे : आज गटारी अमावस्या आहे. त्यात गुरुवार आहे. अनेकजण गुरुवारी मांसाहार (Non veg) करणं टाळतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात बुधवारी गटारी साजरी झालीय. झणझणीत रश्शासह कोंबडीवडे (Chicken) आणि माशांवरही (Fish Food) लोकांनी ताव मारलाय. जी आकडेवारी समोर आली आहे, ती खतरनाक आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमधील खवय्यांनी तब्बल दोन हजारपेक्षा जास्त बोकड फस्त केलेत. तर चिकनची 700 टन इतकी जबरदस्त विक्री झाली. माशांनाही मुबलक प्रमाणात मागणी होती. 40 ते 50 टन मासळी पुणे, पिंपरीत फस्त करत गटारी जोरात साजरी करण्यात आलीय. दर वाढलेले जरी असले, तरिही खवय्यांनी मांसाहाराला पसंती दिलीय. दीप अमावस्या गटारी अमावस्या म्हणून ओळखली जाते. गुरुवारी रात्री दीप अमावस्या संपतेय. गुरुवारी मासांहार करणं बहुतांश लोकं टाळत असल्यानं अनेकांनी बुधवारीच म्हणजे एक दिवस आधीच गटारी करणं पसंत केलंय.

बुधवारी काय होते चिकन मटणचे दर?

मटण 680 ते 700 रुपये किलो दराने बुधवारी विकले जात होते. तर चिकनची किंमत 200 रुपये किलो होती. पापलेट 800 ते दोन हजार रुपये तर हलवा 700 ते एक हजार रुपये किलो दर इतक्या विक्रमी दराने विकला जात होता. कोळंबी 180 ते 1400 रुपये प्रति किलो दराने बुधवारी विकली गेली.

गटारीसाठी बाजारही लोकांनी फुलले होते. मटण, मासळी आणि चिकन खरेदीसाठी बुधवारी सकाळपासूनच लोकांनी गर्दी केली होती. गणेश पेटेमधळी मासळी बाजारसह कसबा पेठ, भवानी पेठ, कर्वे रस्ता तसंच लष्खर परिसरामध्ये असलेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट परिसरामध्येही मटण खरेदीसाठी खवय्यांनी रांगा लावलेल्या होत्या. तसंच विश्रांतवाडी, पुणे सातारा रस्त्यावरील पद्मावती आणि पौड रस्ताही गटारी साजरी करण्याची तयारी करण्याच्या मनसुब्याने आलेल्या खरेदीदारांनी भरुन गेला होता.

हे सुद्धा वाचा

पुणे शहर मटण दुकानदार संघटनेने अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्ब अडीच हजार बकऱ्यांची आवक पुणे, पिंपरीमधील बाजारत अमावस्येनिमित्त झाली होती. चिकनला लोकांनी प्रचंड मागणी होती. जवळपास 800 टन चिकनची विक्री पुण्यात झाली असल्याची माहिती पुणे बॉयलर असोसिएशनच्या संचालकांनी दिली आहे. मासळीमध्ये सर्वाधिक पसंती ही सुरमई, रावस, पापलेट, हलवा, कोळंबी आणि वाम या माशांना होती. संभाव्य मागणी लक्षात घेता आधीच 10 ते 12 टन खोल समुद्रातील मासे, कतला, सीलन मासळीची 20 टन आंध्रमधून आयात, तसंच खाडी आणि नदीतील मासळीची प्रत्येकी 700 किलो आणि 500 किलो अशी आवक झाली होती, असंही बॉयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी म्हटलंय.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.