पुणे : कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. कसबापेठमध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. या निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. तर चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देऊन महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत अधिकच वाढल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
पुणे :
खासदार गिरीश बापट यांनी बजावला मतदानाचा हक्क
अहिल्याबाई देवी हायस्कूल मतदान केंद्रावर येत मतदान केलं
ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन मतदानासाठी आले होते
बोटावरील शाई दाखवतं त्यांनी मतदान केल्याचं दर्शवलं
कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी झाली होती
कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली
गणेश बीडकरांना अटक करा
काँग्रेसच्या शहराध्यक्षांची मागणी
गुंड सोबत घेऊन पैसे वाटप केलं जातं होतं
हटकलं असता मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नाही काँग्रेसचा पवित्रा ..
हेमंत रासने यांनी आज सकाळी मतदान केलं, त्यावेळीझाली चूक
रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून रासने यांच्या कृतीवर आक्षेप, कारवाईची मागणी
चुकून शेला गळ्यात राहिला, रासने यांचा खुलासा
चिंचवड पोटनिवडणूकित चाललंय काय?
मतदान केंद्रात मोबाईल वापरास परवानगी नसताना व्हिडीओ चित्रण होतेच कसे?
मतदान केंद्रावरील अधिकारी तपासणी का करत नाहीत?
चिंचवडमध्ये सुद्धा गोपनीय मतदान प्रक्रियेचा भंग
मतदाराकडून ईव्हीएम मशीनवर असलेल्या चिन्हा समोरील बटण दाबून मतदान केल्याचा व्हिडिओ टीव्ही 9 मराठीच्या हाती
निवडणूक विभाग काय कारवाई करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष
255 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निवडणूक आयोगाची देखरेख
दोन हजारपेक्षा जास्त मतदान मशीन मतदान केंद्रावर
12 ते 13 इव्हिएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मशीन तत्काळ बदलल्या
ईव्हीएम मशीन बिघडलेल्या मतदान केंद्रांवर काहीकाळ थांबवावे लागले मतदान
निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या टीमने ईव्हीएम मशिन बदलल्या
मतदानाला सुरळीत सुरुवात
चिंचवडमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान
कसब्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.5 टक्के मतदान
निवडणूकीचा निकाल 2 मार्च रोजी लागणार
कन्या शाळेतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क
शैलेश टिळक, चैत्राली टिळक आणि कुणाल टिळक यांनी केले मतदान
दरवेळी मुक्ताताईंसोबत मतदान करायला जायचो, आज पहिल्यांदाच त्यांच्याशिवाय मतदान करत असल्याचं शैलेश टिळक म्हणाले.
नागरिकांकडून मतदानाला अल्प प्रतिसाद
कसब्यात खूप कमी मतदान झालं
तिन्ही उमेदवारांनी मतदान केलं, पण मतदार घराबाहेर पडेना
उमदेवारांची चिंता वाढली
चिंचवड मतदारसंघातील पिंपळे गुरव मतदारसंघाबाहेर बाचाबाची
पोलिसांनी जमावाला पांगवलं, पोलीस बंदोबस्त वाढवला
पोलीस म्हणतात, सीरियस प्रकार नाही
24 तासाचा प्रवास करून अमृता देवकर पोहोचल्या मतदानाचा हक्क बजवायला
मला कळलं निवडणूक लागली आहे आणि मी लगेच माझा हक्क बजावण्यासाठी आले
मतदान हा आपला अधिकार आणि तो हक्क आहे सगळ्यांनी तो केलाच पाहिजे
आपल्याला पुढे जायचं असेल आपला देश पुढे न्यायचा असेल तर मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला हाच संदेश देण्यासाठी मी इतक्या लांबून मतदानासाठी आले आहे
अमृता देवकर यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया
नुतन महाविद्यालयात बजावला मतदानाचा हक्क
हेमंत रासने भाजपचे कसब्यातील उमेदवार
मतदार आपल्याच विजयी करतील असा रासने यांचा विश्वास
आपण महापालिकेत विविध पदावर असताना चांगली कामे केल्याने मतदार पोचपावती देतील, असा विश्वास
जनतेने निवडणूक हातात घेतली आहे, मोठ्या फरकाने मला ही जनता विजयी करेल
नागरिकांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
खासदार अमोल कोल्हे मी जवळचे मित्र आहेत
ते कामात व्यस्त असतील. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले नसतील
सर्वसामान्य जनता बरोबर असल्याने विजय निश्चित : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे
चिंचवड तिरंगी लढतीतील अपक्ष वंचित बहुजन पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांनी घेतले ग्रामदैवत म्हातोबा आणि आईचे आशीर्वाद
यावेळी घरातील महिलांनी राहुल कलाटे यांच औक्षण करून विजयी भवच्या शुभेच्छा दिल्या
7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे
सर्व सामान्य जनता बरोबर असल्याने विजय निश्चित असल्याचा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी विश्वास व्यक्त केला आहे
भाजपच्या चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावला
महापालिका शाळेत बजावला मतदानाचा हक्क
निवडणुकीत विकासाचा मुद्दाही उचलला होता, भावनिक मतेही मिळतील
अश्विनी जगताप यांना विजयाची खात्री
राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचं मतदान
देवदर्शनापूर्वी केलं मतदान
भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप मतदानासाठी निघाल्या
मतदानाला निघण्यापूर्वी अश्विनी जगताप यांचं औक्षण
कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
मतदान करणाऱ्या उमेदवारांमध्ये धंगेकर पहिले
देवदर्शनानंतर धंगेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर केलेले उपोषण हा आचार संहिता भंग म्हणून या निवडणूक रद्द करण्याची मागणी
दोन्ही पक्षांनी नियमांचा भंग केला
अभिजीत बिचुकले यांनी थेट निवडणूक कार्यालयात जाऊन केली तक्रार
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
चिंचवडमध्ये 13 मतदान केंद्र संवेदनशील असून त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे
7 पोलीस उपायुक्त, 110 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 1100 पोलीस कर्मचारी, 275 होमगार्ड , 05 निमलष्करी दलाच्या तुकड्या, 1 सीआरपीएफ तुकडी असा बंदोबस्त ठेवला
कसब्यात महिला मतदार 1 लाख 38 हजार 550 आहेत
पुरुष मतदार 1 लाख 36 हजार 873 आहेत
तर तृतीयपंथी मतदार 5 आहेत
एकूण मतदार केंद्र 76 आहेत
एकूण बूथ संख्या 270 आहे
9 मतदार केंद्र संवेदनशील आहेत
मतदानासाठी 1300 पोलीस कर्मचारी तैनात
एकूण 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत
महविकास आघाडीचे रवींद्र धगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत आहे
सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार
कसबा आणि चिंचवडमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीत मुख्य लढत
मनसेचा भाजपला तर चिंचवडमध्ये वंचित आघाडीचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या निवडणुकीकडे