Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काकी माझ्या आई सारख्या, मला वाईट वाटत होतं की…’, अजित पवार जिंकून आल्यानंतर प्रतिभा पवारांबद्दल काय म्हणाले?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बारामतीची जागा चर्चेचा विषय बनली होती. काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांच्यातील लढतीमुळे ही निवडणूक विशेष महत्त्वाची होती. शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचाराला पाठबळ दिले होते. तरीसुद्धा अजित पवारांनी विजय मिळवला. निवडणुकीनंतर अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबाबत आपले मत व्यक्त केले आणि भविष्यातील रणनीतीबाबत माहिती दिली.

'काकी माझ्या आई सारख्या, मला वाईट वाटत होतं की...', अजित पवार जिंकून आल्यानंतर प्रतिभा पवारांबद्दल काय म्हणाले?
अजित पवार जिंकून आल्यानंतर प्रतिभा पवारांबद्दल काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 10:08 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. बारामतीत पवार काका-पुतण्यामध्ये लढत होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांच्यात ही लढत होती. या निवडणुकीत युगेंद्र पवार यांच्या मागे शरद पवारांनी पूर्ण ताकद लावलेली होती. तर अजित पवारांनी सुद्धा बारामतीत ठाण मांडून प्रचार केला होता. पवार कुटुंबातीलच काका-पुतण्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढत बनली होती. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, त्यांच्या कन्या रेवती सुळे यांनी युगेंद्र पवार यांच्या बाजूने तुफान प्रचार केला. पण अखेर युगेंद्र पवार यांचा पराभव झाला. बारामतीचा निकाल समोर आल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या काकूबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

“युगेंद्रला उमेदवारी नको द्यायला हवी होती. काकी माझ्या आई सारख्या आहेत. मला वाईट वाटत होतं की त्या भिंगरी लागल्या सारख्या फिरत होत्या. ताईचे काम केले म्हणून लगेच त्याला उमेदवारी दिली. त्याला शिकू द्यायला हवे होते. काम करू द्यायला हवे होते”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. यावेळी अजित पवारांना पुढच्या रणनीतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आम्ही ‘देवगिरी’वर बसू आणि एकत्रित बसून निर्णय घेऊ. आम्हाला अधिवेशनाच्या पुढे जायचे आहे. ते सगळ्यात महत्वाचे आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.

अजित पवारांना कुणी कुणी शुभेच्छा दिल्या?

“मला नेता तर निवडले पाहीजे. ते बघू उद्या आमदार काय करतात बघतो. सगळ्यांना ‘देवगिरी’वर बोलावले आहे”, असं अजित पवार म्हणाले. “त्यांचा आज खूप मनस्ताप झाला आहे. ते जे काही बोलत होते त्यांना कळत नव्हते”, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. यावेळी अजित पवारांना कुणी कुणी शुभेच्छा दिल्या? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मला केद्रीय गृहमंत्री अमित शाह, आई आणि माझ्या तीन बहिणींकडून, मुलांनी शुभेच्छा दिल्या. तुम्ही पत्रकार मित्रांनी शुभेच्छा दिल्या”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

“काल तर बाळासाहेब थोरात गाडीत फिरत होते. जयंतराव गाडी चालवत होते. त्याला संजय राऊत थोडे पुश करत होते. इस्लामपूर वाचल्याने मी म्हणत होतो. थोडे लक्ष दिले असते तर करेक्ट कार्यक्रम झाला असता”, असा टोला अजित पवारांनी लगावला.

आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.