आता लक्ष विधानसभा…! पुण्यात भाजपच्या चिंतन बैठकीचे आयोजन, अमित शाह फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत.

आता लक्ष विधानसभा...! पुण्यात भाजपच्या चिंतन बैठकीचे आयोजन, अमित शाह फुंकणार निवडणुकीचे रणशिंग
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 9:09 AM

Maharashtra Assembly Elections : लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यात बालेवाडी परिसरात असलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या निमित्ताने अमित शाह हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच भाजप हे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग पुण्यातूनच फुंकणार असल्याचे बोललं जात आहे.

5 हजार 300 पदाधिकारी उपस्थित राहणार

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. त्यानतंर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यासोबतच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशनही आज पुण्यात होणार आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते असे जवळपास 5 हजार 300 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत.

भाजपकडून जास्तीत जास्त जागा लढवण्याचा निर्धार

पुण्यात आज होणाऱ्या चिंतन बैठकीत अमित शाह हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यासोबतच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीसाठी मार्गदर्शनही करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त जागा लढवायच्या आणि मित्र पक्षांना देखील योग्य उमेदवार निवडण्यासाठी आग्रह धरायचा, अशी रणनीती भाजपकडून आखली जात आहे. विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हबाबतही राजकीय प्रस्तावही या निवडणुकीत मांडला जाणार असल्याचे बोललं जात आहे.

पुण्यातून विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार

विधानसभेच्या तयारीसाठी भाजपकडून हे अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अमित शाह दुपारी ३ वाजता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या संमेलनात विधानसभेसाठी भाजपचा रोड मॅपही ठरवला जाणार आहे. भाजपच्या संमेलनात विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हबाबत राजकीय प्रस्ताव मांडला जाणार आहे. या बैठकीसाठी अमित शाह काल रात्रीच पुण्यात दाखल झाले आहेत. यामुळेच भाजप पुण्यातून विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार असल्याचे चित्र एकंदर पाहायला मिळत आहे.

वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल

पुण्यात बालेवाडीत परिसरातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपकडून ही चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी तब्बल एक हजार पोलिसांचा बंदोबस्त बालेवाडी परिसरात तैनात करण्यात आला आहे. अमित शहा हे पुण्यात दाखल झाले असून सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये ते मुक्कामी आहेत. या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहे. त्यामुळेच आज पुण्यातील बालेवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

कमला मिलच्या टाईम्स टॉवरमध्ये अग्नितांडव, घटनास्थळावरुन tv9 चा आढावा
कमला मिलच्या टाईम्स टॉवरमध्ये अग्नितांडव, घटनास्थळावरुन tv9 चा आढावा.
रात्रीस खेळ चाले? रात्री 12 वाजता मंत्री सत्तार अचानक जरांगे पाटलांकडे
रात्रीस खेळ चाले? रात्री 12 वाजता मंत्री सत्तार अचानक जरांगे पाटलांकडे.
सापळा रचला अन् अलगद फसला, फरार जयदीप आपटे पोलिसांच्या हाती कसा लागला?
सापळा रचला अन् अलगद फसला, फरार जयदीप आपटे पोलिसांच्या हाती कसा लागला?.
टकल्या-हेकण्या, बैठकीवेळी नेमकं काय घडलं? ST कर्मचाऱ्यांना पगारवाढ पण,
टकल्या-हेकण्या, बैठकीवेळी नेमकं काय घडलं? ST कर्मचाऱ्यांना पगारवाढ पण,.
'चहा-पोहे तयार होते, आपटे खायला येणार होता अन्...', कोणी केला हल्लाबोल
'चहा-पोहे तयार होते, आपटे खायला येणार होता अन्...', कोणी केला हल्लाबोल.
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, आव्हाडांवर गुन्हा दाखल करा... भाजपची मागणी
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, आव्हाडांवर गुन्हा दाखल करा... भाजपची मागणी.
ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांची नावं TV9 मराठीच्या हाती
ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांची नावं TV9 मराठीच्या हाती.
मोदींच्या माफीमागे 'ही' 3 कारणं, माफीनाम्यावर राहुल गांधींचा हल्लाबोल
मोदींच्या माफीमागे 'ही' 3 कारणं, माफीनाम्यावर राहुल गांधींचा हल्लाबोल.
'दीड वर्ष झाले तरी मोदी मणिपूरला गेले नाही, ते जाऊच शकत नाही कारण...'
'दीड वर्ष झाले तरी मोदी मणिपूरला गेले नाही, ते जाऊच शकत नाही कारण...'.
'कोण थुंकलं तर वाहून जाईल, जलील चिरकूट माणूस', भाजप नेत्याचा हल्लाबोल
'कोण थुंकलं तर वाहून जाईल, जलील चिरकूट माणूस', भाजप नेत्याचा हल्लाबोल.