Rahul Narwekar | ‘योग्य निर्णय घेईन म्हणतात, हे अज्ञान’, कोणी केली विधानसभा अध्यक्षांवर इतकी बोचरी टीका?
Rahul Narwekar | आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सुनावणीस होत असलेल्या विलंबाबद्दल घटनातज्ज्ञ बापट काय म्हणाले? या दिरंगाईवरून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलंच फटकारलं आहे.
पुणे (प्रदीप कापसे) : आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सुनावणीस विलंब होत आहे. त्यावरुन विरोधी पक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं आहे. आता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कान टोचले आहेत. “विधासनसभा अध्यक्षांनी मीडियाशी बोलायचं नसतं, मात्र आता हे अध्यक्ष सारख माध्यमांशी बोलतात. योग्य निर्णय घेईन म्हणतात, हे अज्ञान आहे” अशा शब्दात उल्हास बापट यांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली. “राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या याचिकांचा संबंध आहे. शिवसेनेच्या याचिकेचा परिणाम हा राष्ट्रवादी काँग्रेसवर सुद्धा होणार” असं उल्हास बापट म्हणाले.
“हे अध्यक्ष म्हणतात की सुप्रीम कोर्ट ढवळा ढवळ करू शकत नाही. पण सुप्रीम कोर्ट हे निर्देश देवू शकतं. सुप्रीम कोर्टाच्याही काही चुका झाल्या आहेत” असं उल्हास बापट म्हणाले. “त्यांनी रिजनेबल टाइम ठरवूनच द्यायला हवा होता. सुप्रीम कोर्टाला अध्यक्षांना पदावरून हटवण्याचा अधिकार नाही. मात्र आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत हे पाहव लागेल” असं उल्हास बापट म्हणाले. राहुल नार्वेकर आज कोर्टात सुधारित वेळापत्रक देणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. नार्वेकर आज कोर्टातून अभिप्राय मागू शकतात, असही सूत्रांनी म्हटलय. राहुल नार्वेकर काय म्हणाले?
याआधी तयार केलेल वेळापत्रक नार्वेकर आज कोर्टात सादर करतील. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची कायदेशतज्ज्ञांशी चर्चा झाली आहे. कोर्टाने लेखी आदेश दिल्यास वेळापत्रकात बदल करण्याची राहुल नार्वेकर यांची भूमिका आहे. आजच्या सुनावणीमध्ये अध्यक्षांच्या बाजूने भूमिका कशी मांडली जाते ? कोर्ट लेखी आदेश देऊ शकत का? हे आज समजेल. “मी संविधानाला मानणारा व्यक्ती आहे. कोर्टाने दिलेला आदेश आणि आदर ठेवीन. विधिमंडळाच अध्यक्ष असल्याने विधिमंडळाच सार्वभौमत्व कायम राखण माझ कर्तव्य आहे” असं राहुल नार्वेकर म्हणाले. “राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत. चोरांना सुरक्षा देत आहेत” असं म्हणत संजय राऊत यांनी नार्वेकरांवर थेट निशाणा साधला आहे.