सत्ता स्थापनेनंतर आता पुणे पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासह पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत उत्सुकता आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

सत्ता स्थापनेनंतर आता पुणे पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 5:50 PM

महाराष्ट्राला 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाला कोणती खाती दिली जातील? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधी शिवसेना आणि भाजपमध्ये गृहमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा होती. त्याबाबतचा नेमका निर्णय काय झालाय? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण आता पालकमंत्रीपदासाठीदेखील महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आता रस्सीखेच सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर दुसरीकडे पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनही पुणे पालकमंत्रीपदाबाबत दावा करण्यात आला आहे. पालकमंत्रीपद आम्हाला हवं, असं प्रदीर गारठकरांची मागणी आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. प्रदीप गारठकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत. “वरिष्ठ सांगतील ते मी करणार”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळेल? असं पत्रकारांनी विचारलं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “तुम्ही अशा माणसाला प्रश्न विचारता ज्याला प्रश्नही तोच आणि उत्तरही तेच आहे की, माझे श्रेष्ठी मला जे सांगतात ते मी करतो”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच कार्यकर्ताच काय नेतासुद्धा आपल्याला अधिकाधिक चांगलं मिळावं, अशी इच्छा व्यक्त करत असतो. पण आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होऊ शकत नाही”, असंदेखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळे पुणे पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते? याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्यावर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला तेव्हादेखील पुणे पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच बघायला मिळाली होती. अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते. पण अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांची पुणे पालकमंत्रीपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्याऐवजी अजित पवार यांना पुणे पालकमंत्रीपद मिळालं होतं. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं होतं. यावेळी देखील पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे कुणाला पालकमंत्रीपद मिळतं? हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.