Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : वाद निर्माण झाला नाही, तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही – मुख्यमंत्री

"कालच दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यालयाच उद्घाटन मी केलं. स्वातंत्र्यानंतर साहित्य संमेलन झालय पण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा दिल्लीत अखिल भारतीय साहित्य संमेलन होतय. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याच देखील उद्घाटन करण्याची संधी मिळाली" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : वाद निर्माण झाला नाही, तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही - मुख्यमंत्री
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 1:58 PM

“आज तिसऱ्या विश्व मराठी संमलेनामध्ये आपल्य सर्वांच मनपूर्वक स्वागत करताना मला आनंद होतोय. माय मराठीवर प्रेम करणारे आणि परदेशातून जे लोक इथे आलेत, त्यांचं विशेष स्वागत आणि अभिनंदन या निमित्ताने मी करतो. पुणे विद्येच माहेरघर आहे. आपली सांस्कृतिक राजधानी आहे. माझ्या सारख्या नागपुरी माणसाला तर पुण्याची मराठी म्हणजे प्रमाण मराठी आहे त्यामुळे प्रमाण मराठीच्या माहेरघरी विश्व मराठी संमेलन होतय ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुण्यात विश्व मराठी संमलेनाच्या कार्यक्रमात बोलत होते. “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं संमलेन आहे, याच आपल्या सर्वांना आनंद आहे. त्या निमित्ताने मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मधु मंगेश कर्णिक यांचा आपण सत्कार केला. भारत सरकारने पद्यश्री किताब यापूर्वी दिला आहे. कथा, कांदबरी, ललित, कविता, नाटक, चरित्र- आत्मचरित्र सगळ्या गोष्टी साहित्याचे सर्व प्रकार ज्या व्यक्तीने निर्माण केले, असं सृजनशील व्यक्तीमत्व चौथ्या वर्षी साहित्याची निर्मिती सुरु केली, ते नाबाद 93 अशा मधु मंगेश कर्णिक यांनी खऱ्या अर्थाने मराठीला समृद्ध केलं, त्यांचा सत्कार करताना आपल्या सर्वांना अतिशय आनंद होतोय” असं देवेंद्र फडणवीस या प्रसंगी म्हणाले.

सावरकरांशिवाय आपण मराठीचा विचार करु शकत नाही

“इथे जे कवि संमेलन होणार आहे, त्यासाठी काव्यपाठ करण्यासाठी बेळगाव-निपाणीहून मराठी कवी येणार आहेत. मराठी माणसाच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहण्याची जी भावना असते, ती यात आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आपल्या बालगंर्धवला सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम होणार आहे. जेव्हा आपण मराठीचा विचार करतो, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय आपण मराठीचा विचार करु शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला जी शब्दांची माय दिली, जो शब्दकोष त्यांनी दिला, शब्दांचा खजिना दिला. त्यामुळे निश्चितपणे हा एक चांगला महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठी माणसाला कलह करायला आवडतो

“मगाशी उदय सामंत तुम्ही म्हणालात की, काही लोकांनी वाद तयार केले, उदयजी मी तुम्हाल सांगू इच्छितो की, साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो. विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही, तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही. वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे. आपण संवेदनशील लोक आहोत. वाद-विवाद, प्रतिवाद झाला पाहिजे. त्यातून खऱ्या अर्थाने मंथन होऊ शकतं, हे मी म्हणत नाही. आठव्य शतकात कुवलय माला नावाच एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात मराठीमाणसाचे वेगवेगळे गुण-अवगुण सांगितले आहेत. त्यात एक चॅप्टर आहे, मराठी माणसाला कलह करायला आवडतो, असं आठव्या शतकात लिहून ठेवलय. त्यामुळे तुम्ही फार काळजी करु नका. अशा प्रकारची संमलेन आपण करत रहायची. कुणी नाव ठेवेल, कुणी चांगलं म्हणेल. त्यातून मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती, बुद्धी मिळते” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दत्ता गाडेला कोर्टात हजर करणार; कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक
दत्ता गाडेला कोर्टात हजर करणार; कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक.
स्वारगेट प्रकरणातील आरोपी बचावला, 3 दिवसात तीनदा आत्महत्येचा प्रयत्न?
स्वारगेट प्रकरणातील आरोपी बचावला, 3 दिवसात तीनदा आत्महत्येचा प्रयत्न?.
दत्तात्रय गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न, वैद्यकीय तपासणीतून काय आलं समोर?
दत्तात्रय गाडेचा आत्महत्येचा प्रयत्न, वैद्यकीय तपासणीतून काय आलं समोर?.
मुंबईच्या चिंचपोकळीतील इमारतीत अग्नितांडव, भीषण आगीचा बघा VIDEO
मुंबईच्या चिंचपोकळीतील इमारतीत अग्नितांडव, भीषण आगीचा बघा VIDEO.
'अरे थांबा रे...जरा बोलताना तारतम्य...', अजितदादांनी मीडियाला फटकारलं
'अरे थांबा रे...जरा बोलताना तारतम्य...', अजितदादांनी मीडियाला फटकारलं.
गुनाटच्या ग्रामस्थांचा सत्कार करणार; पोलीस आयुक्तांनी केलं कौतुक
गुनाटच्या ग्रामस्थांचा सत्कार करणार; पोलीस आयुक्तांनी केलं कौतुक.
'दत्ता गाडेला अटक करायला उशीर झाला, पण..', अमितेश कुमार स्पष्टच बोलले
'दत्ता गाडेला अटक करायला उशीर झाला, पण..', अमितेश कुमार स्पष्टच बोलले.
'गृहराज्यमंत्री दिव्यच', संजय राऊतांनी घेतला योगेश कदमांचा समाचार
'गृहराज्यमंत्री दिव्यच', संजय राऊतांनी घेतला योगेश कदमांचा समाचार.
मंत्री कदमांच्या 'त्या' विधानावरून वाद; विरोधकांनी उठवली टीकेची झोड
मंत्री कदमांच्या 'त्या' विधानावरून वाद; विरोधकांनी उठवली टीकेची झोड.
'दत्ता मी येतोय...', आरोपीसह पोलिसांचा पहिला संवाद अन् गोड बोलून अटक
'दत्ता मी येतोय...', आरोपीसह पोलिसांचा पहिला संवाद अन् गोड बोलून अटक.