लॉकडाऊन इफेक्ट, पुण्यात सलग आठव्या दिवशी नव्या रुग्णसंख्येत घट
कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे (Pune Corona Patients).
पुणे : कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल 15 दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 50 हजारांच्या खाली आहे. पुणे (Pune Corona Patients) शहरातही हा बदल बघायला मिळाला आहे. एकटच्या पुणे शहरात सलग आठव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट झाल्याचं बघायला मिळालं आहे (Pune Corona Patients). पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.
पुण्यातील गेल्या आठ दिवसांची नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
दिनांक/कोरोनामुक्त/नवे रुग्ण 26 एप्रिल /4351/2538 25 एप्रिल /4759/4631 24 एप्रिल /4789/3991 23 एप्रिल /5634/4465 22 एप्रिल /4851/4539 21 एप्रिल /6530/5529 20 एप्रिल /6802/5138 19 एप्रिल /6473/4587
पुण्यात सध्या कोरोनाची नेमकी परिस्थिती काय?
पुण्यात आज दिवसभरात 2538 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 4351 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पुणे शहरात दिवसभरात 70 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामध्ये पुण्याबाहेरील 16 रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात सध्या 1371 रुग्णांची प्रकृती ही गंभीर आहे. पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 2 हजार 655 इतकी आहे. यापैकी 3 लाख 48 हजार 681 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. शहरात सध्या 47 हजार 420 रुग्ण सक्रिय आहे. तर आतापर्यंत 6 हजार 554 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात दिवसभरात 48,700 नवे कोरोनाबाधित रुग्ण
राज्यात कोरोनाचे रुग्ण 60 हजारांहून अधिक सापडत आहेत. परंतु आज रुग्ण संख्येत काहीसा दिलासा मिळालाय. राज्यात आज 48,700 कोरोना रुग्णांचे निदान झालेय. राज्यात आज एकूण 6,74,770 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 43,43,727 झालीय. राज्यात आज 542 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5% एवढा झालाय.
Maharashtra reports 48,700 new COVID-19 cases, 71,736 discharges and 524 deaths in the last 24 hours
Total cases: 43,43,727 Active cases: 6,74,770 Total discharges: 36,01,796 Death toll: 65,284 pic.twitter.com/9dvTWVCC6u
— ANI (@ANI) April 26, 2021
हेही वाचा : कोविडविरोधातील लढ्यात रिलायन्स फाऊंडेशनचं मोठं पाऊल; मुंबईत 875 कोरोना बेडची तरतूद