गुन्हेगारांवर वचक ठेवा, चोऱ्या होऊ नये म्हणून गस्त वाढवा; अजित पवारांच्या पोलिसांना सूचना

पोलिसांनी सेवा बजावताना नियमांचे पालन करुन चोखपणे कर्तव्य पार पाडावे. गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचं उदात्तीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या (Ajit Pawar gives instruction to Police).

गुन्हेगारांवर वचक ठेवा, चोऱ्या होऊ नये म्हणून गस्त वाढवा; अजित पवारांच्या पोलिसांना सूचना
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 8:49 PM

पुणे : “पोलीस विभागाला अधिक मजबूत करण्याचं काम शासन करत आहे. पोलिसांनी देखील सेवा बजावताना नियमांचे पालन करुन चोखपणे कर्तव्य पार पाडावे. गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचं उदात्तीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. चोऱ्या होवू नयेत, यासाठी रात्रीची गस्त वाढवा. गुन्हेगारांवर वचक राहील, असं काम करा”, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील रिक्रिएशन सभागृहात ते बोलत होते (Ajit Pawar gives instruction to Police).

‘पोलीस विभागाला आवश्यक सुविधा पूरवणार’

“सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रशिक्षण द्या. कर्तव्य निभावताना एकही चूक घडू नये, याची खबरदारी घ्या. त्याचबरोबर आपल्या दागदागिन्यांची चोरी होवू नये यासाठी नागरिकांनी देखील सावधानता बाळगावी, वैयक्तिक माहिती समाजमाध्यमांद्वारे उघड करु नये”, असंदेखील आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. पोलीस विभागाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासह या विभागातील रिक्त पदभरतीसाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत, असं पवार यांनी यावेळी सांगितलं.

‘पोलीस विभाग अधिकाधिक सक्षम करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील’

“पोलीस विभाग हा शासन व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी या विभागाची आहे. पोलीस आयुक्तालय, पोलीस स्टेशन्स आणि पोलिसांसाठी चांगली घरे तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देऊन पोलीस विभाग अधिकाधिक सक्षम करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करुन निर्णय घेऊ’

कोरोना प्रतिबंधासाठी पुण्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करुन उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येईल. तथापि नागरिकांनी देखील मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक अंतर, गर्दी टाळणे अशाप्रकारे स्वयंशिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले (Ajit Pawar gives instruction to Police).

हेही वाचा :

कल्याणच्या शिवप्रेमीकडून शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीत मानवंदना, रिक्षात साकारला दुर्गाडी किल्ला

VIDEO : Ajit Pawar speech Pune | फिरायला जाऊन फोटो सोशल मीडियावर टाकताय? ऐका अजित पवारांचा खास सल्ला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.