अजितदादा सार्वजनिक कार्यक्रमांपासून अचानक दूर, प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाही. यामुळे अजित पवार पुन्हा नाराज झाले की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यानंतर यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अजितदादा सार्वजनिक कार्यक्रमांपासून अचानक दूर, प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 2:15 PM

पुणे | 29 ऑक्टोंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेना-भाजपमध्ये सहभागी झाल्यापासून चर्चेत आहे. अधूनमधून अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत असतात. आता पुन्हा अजित पवार दोन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाही. यामुळे चर्चा सुरु झाली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते शनिवारी होणार होता. परंतु मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाणे टाळले. रविवारी ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाही. त्याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्या असल्याचे ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी चर्चांना दिला पूर्णविराम

अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे ते नाराज झाल्या असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट केले. त्यानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे. शनिवारी केलेल्या चाचणीत हे निदान झाले आहे. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस आराम करण्याच्या सूचना केल्या आहेत. अजित पवार आपल्या सर्वजनिक सेवांसाठी कटिबद्ध आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते पुन्हा जनतेची कामे पूर्ण ताकदीने सुरू करतील,’ अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत डेंग्यूचे रुग्ण वाढले

अजित पवार यांना डेंग्यू झाल्यानंतर मुंबईतील आकडेवारी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात मुंबईत डेंग्यूचे 1360 प्रकरणे समोर आली होती. मागील महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 300 पेक्षा जास्त आहे. मुंबईत जून महिन्यात 353 तर जुलै महिन्यात 413 डेंग्यूचे रुग्ण मिळाले होते. मुंबई मनपाच्या पथकाला गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होणारी सरासरी 900 ठिकाणे मिळत आहेत. मुंबईप्रमाणे पुणे शहरातही डेंग्यूचे रुग्ण वाढले आहे. पुणे मनपाने नुकतीच डेंग्यूची उत्पत्ती आढळल्या ठिकाणी लोकांना दंड केला होता. आता अजित पवार यांनाच हा आजार झाल्यामुळे डेंग्यूची चर्चा अधिक प्रमाणात सुरु झाली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.