पुणे, ठाणे येथील रिक्षांमध्ये होणार बदल, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

e auto rickshaw | राज्यात रिक्षासंदर्भात पायलेट प्रोजेक्ट सुरु होणार आहे. हा प्रोजक्ट पुणे पिंपरी चिंचवड आणि ठाणे शहरातून होणार आहे. यामुळे या दोन्ही शहरांमधील रिक्षांमध्ये बदल होणार आहे. त्याचा फायदा दोन्ही शहरातील नागरिकांना होणार आहे. तसेच या प्रोजेक्टमुळे प्रदूषण होणार नाही.

पुणे, ठाणे येथील रिक्षांमध्ये होणार बदल, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 12:41 PM

पुणे, मुंबई | 31 ऑक्टोंबर 2023 : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक वाहने आहेत. ठाणे शहरातील वाहनांची संख्याही मोठी आहे. पुणे शहरवासियांसाठी पीएमपीएमएलसोबत रिक्षाही महत्वाचे साधन आहे. ओला, उबेर रिक्षांप्रमाणे सीटर रिक्षांचा वापर पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर होत आहे. या शहरातील रिक्षा संदर्भात राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शहरांसाठी हा पायलेट प्रोजेक्ट असणार आहे. त्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर हा प्रयोग राज्यात राबवण्यात येणार आहे. सरकार या दोन्ही शहरांत ई- रिक्षा सुरु करणार आहे. यामुळे या शहरांतील प्रदूषणही कमी होणार आहे. पुणे शहरात प्रदूषणाची समस्या मोठी आहे.

प्रदूषण रोखले जाणार

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये लवकरच सरकारकडून ‘ई-रिक्षा’ हा पायलेट प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. शहरांमध्ये वाढलेले हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी ई रिक्षा हा महत्वाचा प्रोजक्ट सुरु होणार आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रणाबरोबर स्वस्तात नागरिकांना प्रवास करता येणार आहे. या पायलेट प्रोजेक्टसाठी पुणे शहरातील पिंपरी चिंचवड आणि ठाणे शहराची निवड करण्यात आली आहे. ई-रिक्षाच्या प्रकल्पाची सुरूवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातून आणि पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

काय करणार सरकार

ठाणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जितक्या रिक्षांची नोंदणी झालेली आहे, त्या रिक्षांच्या बदल्यात सरकारतर्फे ई-रिक्षा दिल्या जाणार आहेत. या ई-रिक्षासाठी चार्जिंग पाईंटचा विषय नसणार आहे. सरकारकडून या रिक्षांसाठी बॅटरी स्टेशनची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी रिक्षा चालकांना बॅटरी संपल्यानंतर संपलेली बॅटरी देऊन त्या बदल्यात चार्ज केलेली दुसरी बॅटरी दिली जाणार आहे. यामुळे रिक्षा चालकांचा चार्जिग करतानाचा वेळही वाचणार आहे. सरकारचे ई-रिक्षाचे हे धोरण अंतिम टप्यात आहे. लवकरच हा पायलट प्रोजेक्ट ठाणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राबवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे आणि रिक्षा चालकांना नवीन गुंतवणूक करावी लागणार नाही.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.