जोतिबांनी जिथे पहिली मुलींची शाळा सुरु केली त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचं रुपांतर स्मारकात होणार

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक आज (11 फेब्रुवारी) मंत्रालयात आयोजित करण्यात आली (Maharashtra government will convert Bhidewada into memorial).

जोतिबांनी जिथे पहिली मुलींची शाळा सुरु केली त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचं रुपांतर स्मारकात होणार
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 3:29 PM

पुणे : पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पाहिली शाळा सुरु केली. या वास्तुचे संवर्धन करण्यासाठी ही वास्तू स्मारकामध्ये रुपांतरित करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करावे, अशी सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत (Maharashtra government will convert Bhidewada into memorial).

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक आज (11 फेब्रुवारी) मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून भूसंपादनाचे काम पाहणारे संबंधित अधिकारी यांच्यासह नगरविकास विभागाचे उपसचिव सतिश मोघे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भुजबळ यावेळी म्हणाले, “महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा ही वास्तु खाजगी मालकीची आहे. तसेच या वास्तुत राहणाऱ्या भाडेकरुंनी दहा वर्षापूर्वी न्यायालयात धाव घेतल्याने सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी त्वरित समिती नेमण्यात यावी. या समितीमध्ये नगरविकास, सांस्कृतिक कार्य आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा समावेश असावा. सदर समिती भिडेवाडा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी काय करता येईल तसेच याप्रकरणात न्यायालयाच्या बाहेर संमतीने काय करता येईल याबाबतची शक्यताही तपासण्यात यावी.”

येत्या 15 दिवसात पुन्हा बैठक लावण्यात येणार : अमित देशमुख

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक असणारी समिती नेमण्याबरोबरच येत्या 15 दिवसात याविषयाबाबत पुढील बैठक बोलवण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील बैठकीसाठी संबंधित विभागांबरोबरच ॲडव्होकेट जनरल यांनाही बोलविण्यात येईल. फुले दाम्प्त्याने भिडेवाडा येथे सुरु केलेल्या मुलींच्या शाळेची वास्तू सांस्कृतिक कार्य आणि पुरातत्व विभागामार्फत राज्य स्मारक म्हणून घोषित करण्यासंदर्भातही शासन सकारात्मक असल्याचे देशमुख यांनी सांगितले (Maharashtra government will convert Bhidewada into memorial).

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.