महाराष्ट्र केसरीला दिली जाणार चांदीची गदा कशी केली जाते?

महाराष्ट्र केसरीची गदा सागाच्या लाकडापासून बनवली जाते. त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. या नक्षीकामासाठी २८ गेज चांदीचा पत्रा वापरला जातो. मानाची समजली जाणारी विजेत्याची गदा मिळवणं राज्यातील प्रत्येक मल्लाचं स्वप्न असतं. ही गदा मिळवण्यासाठी लढत पुण्यात सुरु झालीय.

महाराष्ट्र केसरीला दिली जाणार चांदीची गदा कशी केली जाते?
पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु झाली आहेImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 12:59 PM

पुणे : maharashtra kesari : पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra Kesari 2023)सुरु झालीय. या स्पर्धेत राज्यभरातील तब्बल ९०० कुस्तीपटू सहभागी झालेय. मानाची समजली जाणारी विजेत्याची गदा मिळवणं राज्यातील प्रत्येक मल्लाचं स्वप्न असतं. ही गदा मिळवण्यासाठी लढत पुण्यात सुरु झालीय. पुण्याचे माजी महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी स्पर्धेसाठी मोठ्या बक्षीसांची घोषणा केलीय. ते यंदाच्या स्पर्धेचे आयोजक आहे. विजेत्यांना महिंद्राची थार गाडी, ट्रॅक्टर आणि जावाच्या 18 टू-व्हीलर देण्यात येणार आहे. राज्यातील पैलवानांसाठी सर्वात मोठी असणाऱ्या या स्पर्धेचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही १९६१ मध्ये सुरु झाली. स्पर्धा सुरु झाली तेव्हा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीनं विजेत्यांना सन्मान चिन्ह म्हणून ही गदा दिली जाते.१९८२ पर्यंत ही परंपरा कायम होती. त्यानंतर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली. ही गदा बनवण्याचे काम पंगांठी कुटुंबीय करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

कशी बनती गदा :

महाराष्ट्र केसरीची गदा सागाच्या लाकडापासून बनवली जाते. त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. या नक्षीकामासाठी २८ गेज चांदीचा पत्रा वापरला जातो. गदेचे वजन सुमारे ८ ते १० किलो असते. गदेची उंची ही साधारण २७ ते ३० इंच असते. तिचा व्यास ९ ते १० इंच असतो. या गदेवर एका बाजूला हनुमानाचे तर दुसऱ्या बाजूला कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते .

कशी होते लढत : महाराष्ट्र केसरी ही माती व गादी (मॅट) विभागमध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदेसाठी अंतिम लढत होते. ही लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅटवर घेतली जाते. या लढतीमधील अंतिम विजेता मल्ल हा ‘महाराष्ट्र केसरी’ होतो. त्या मल्लास महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.