खरी महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे? सांगली की पुणे
महाराष्ट्रात प्रथमच महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. कुस्तीगीर परिषदेने सांगलीत 23 व 24 मार्चला स्पर्धा होणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे पुणे येथेही स्पर्धा होत आहे. परंतु खरी स्पर्धा कोणती, यासंदर्भात दावा स्पर्धा समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला आहे.
संजय दुधाणे, पुणे : महाराष्ट्रात पुरुषांप्रमाणे प्रथमच महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra kesri kusti spardha) होत आहे. परंतु महिलांची ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुण्यात कुस्तीगीर महासंघाच्या अस्थायी समितीने १ ते ७ एप्रिलला स्पर्धा घेण्याची घोषणा केली. तर कुस्तीगीर परिषदेने सांगलीत 23 व 24 मार्चला स्पर्धा होणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु खरी स्पर्धा कोणती, यासंदर्भात दावा स्पर्धा समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला आहे.
महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पुणे व सांगली दोन्ही शहरात रंगणार आहे. परंतु पुण्यातील स्पर्धा खऱ्या आहेत. त्यालाच भारतीय कुस्तीगिर महासंघाची मान्यता मिळाली आहे, असा दावा संदीप भोंडवे यांनी केला आहे.या स्पर्धेच्या आयोजिका शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आहे. पुणे येथी विजेत्यांना स्कूटी, आल्टो गाडीचे मिळणार बक्षीस आहे.
राज्यात पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी यासंदर्भात घोषणा केली. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी ‘किताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळणार आहे. परंतु सांगलीची स्पर्धा अधिकृत नाही. त्यामुळे त्यातील विजेत्यांना सरळ संधी मिळणार नाही. त्यांनी पुणे येथील स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतरच त्यांना ही संधी मिळू शकेल, असा दावा संदीप भोंडवे यांनी केला.
काय म्हणतात दिपाली सय्यद
65 वर्षानंतर आता महाराष्ट्र केसरी महिलांसाठी होत आहे. आपल्या महिला ऑलिंपिक खेळतात मात्र महाराष्ट्रात स्थान नाही. आता ही अडचण दूर झाली आहे.
पाच लाखांची कुस्ती
नाशिकच्या सटाणा येथे स्वर्गीय दयाराम सोनवणे यांच्या स्मरणार्थ निमंत्रित पहेलवांची भव्य कुस्ती दंगली आयोजित करण्यात आल्या होती. कुस्तीचे खास आकर्षण महाराष्ट्र उपकेसरी सिकंदर शेख व भोला पंजाबी यांची 5 लाखांची कुस्ती दंगल होती. सिकंदर शेख, भोला पंजाबी, माऊली जमदाडे, देवा थापा, योगेश पवार तर मुलींमध्ये धनश्री फड, प्रिय सराटे सह देशभरात नावाजलेल्या पहिलवांनाचा समावेश होता.
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या मुलीची कुस्तीनेही दर्षकांची दाद मिळवली. तर सर्वात मोठी म्हणजे 5 लाख 51 हजारांची सिकंदर शेख आणि भोला पंजाबीची कुस्ती दंगल पाहण्यासाठी मैदान फुल भरले होते. देवा थापा आणि मनजतशिंग यांची कुस्तीच्या दंगलीने कुस्ती प्रेमींना मोठं आकर्षण ठरली. देशभरातून आलेल्या या कुस्ती दंगल थरार सटाणा करांना अनुभवयास मिळाला.