आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या; व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती

31 मे रोजी दुकाने बंद राहिल्याचा कालावधी 55 दिवसांचा होईल. त्यामुळे तब्बल 50 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे | Maharashtra Lockdown

आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या; व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती
व्यापाऱ्यांचा इशारा
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 10:02 AM

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. पण राज्य सरकारने 1 जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी कळकळीची विनंती व्यापारी समाजाने (Traders) केली आहे. बाजारपेठा खुल्या करण्यासाठी कोणती नियमावली असावी, याचा प्रस्ताव आम्ही सरकारला देऊ. त्यानंतर सरकारशी चर्चा करुन अंतिम नियमावली ठरवता येईल. पण सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवल्यास व्यापाऱ्यांचे हाल होतील, असे कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी म्हटले. त्यामुळे ठाकरे सरकार 1 जुनपासून दुकाने उघडण्यासाठी परवानगी देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Traders and shopekeepr demand to give permission to open shop from 1 June)

यापूर्वी पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनीही ठाकरे सरकारकडे 1 जुनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 31 मे रोजी दुकाने बंद राहिल्याचा कालावधी 55 दिवसांचा होईल. त्यामुळे तब्बल 50 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. परिणामी राज्य सरकारने 1 जुनपासून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एफआरटीडब्ल्युचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केली होती.

व्यापाऱ्यांनी यापूर्वी 15 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्यास विरोध केला होता. मात्र, मुंबई वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांची ही मागणी मान्य केली नव्हती. त्यामुळे राज्यातील व्यापारी समाज नाराज झाला होता. मात्र, कोरोना आणि म्युकरमायकोसिस या दुहेरी संकटामुळे ठाकरे सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. संबंधित बातम्या:

लक्ष्मणरेषा ओलांडू नये, अन्यथा काय होतं ते कोरोनाने दाखवलं : उद्धव ठाकरे

40 दिवस दुकानं बंद होती, व्यापाऱ्यांचे 50000 कोटी बुडालेत, आता महाराष्ट्र अनलॉक कराच: विरेन शाह

Maharashtra Lockdown: मुंबईतील दुकानं बंद ठेवायचेत, तर आर्थिक पॅकेज द्या; अन्यथा लॉकडाऊनला जुमानणार नाही: विरेन शाह

(Traders and shopekeepr demand to give permission to open shop from 1 June)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.