Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RTE प्रवेशात घोळच घोळ, सरकारविरोधात शाळा झाल्या आक्रमक

maharashtra rte admission : राज्यातील शाळा आणि राज्य सरकार यांच्यांत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळांनी अनुदान मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे आरटीई प्रवेश रोखण्याचा ईशारा दिला आहे.

RTE प्रवेशात घोळच घोळ, सरकारविरोधात शाळा झाल्या आक्रमक
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 10:00 AM

अभिजित पोते, पुणे : शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE च्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत निघाली आहे. त्यानंतर शाळा प्रवेशाची तयारी सुरु झाली. मुलांना शाळेत प्रवेशाची तयारी पालकांकडून करण्यात येत आहे. यावेळीच खाजगी शाळा आक्रमक झाल्या आहेत. यामुळे राज्यातील ३ लाख ६४ हजार ४७० मुलांचे प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता आहे. आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी अर्ज करण्यात येतात. परंतु शाळांचे अनुदान थकल्यामुळे शाळांनी ही प्रवेश प्रक्रिया थांबवली आहे.

काय आहे शाळांची मागणी

शासनाने विनाअनुदानित शाळेची 1800 कोटी रुपयांची बाकी थकवली आहे. खाजगी विना अनुदानित शाळांना देण्यात येणारी रक्कम सरकारने थकवली आहे. थकबाकीमुळे शाळेच्या संचालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्या आहे. आता अनेक शाळांनी अनुदान मिळवण्यासाठी RTE प्रवेश रोखला. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत २५% राखीव जागांवर दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आता हे प्रवेश रखडण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

किती थकले रक्कम

राज्यातील शाळांची अनुदानाची मोठी रक्कम थकली आहे. ही रक्कम 1800 कोटी रुपये झाले आहे. राज्य सरकारकडे थकलेली ही रक्कम त्वरित देण्याची मागणी आता खाजगी शाळांनी केली आहे. यासाठी आरटीई प्रवेश रोखण्याचा पवित्रा त्यांनी घेतली.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.

पुणे जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागणार आहे. प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे.प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करावा, असेही आवाहन संचालनालयाने केले आहे.

यादी आहे पोर्टलवर

5 एप्रिल 2023 रोजी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची नावं जाहीर झाल्यानंतर 12 एप्रिल 2023 रोजी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाला आहे. परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी.

भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.