बैलगाडा शर्यतीसाठी झटणारे पुण्याचे महादूशेठ माडीवाले कालवश, अखेरच्या प्रवासात बैलगाडा मिरवणूक

पिंपळगाव (खडकी) गाव बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. बैलगाडा क्षेत्रात गावाचा नाव लौकिक वाढविण्यात माडीवाले परिवाराचा मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे. सन 1956 मध्ये महाराष्ट्रातील पहिली इनामी बैलगाडा शर्यत भरवण्यात या परिवाराचे योगदान होते

बैलगाडा शर्यतीसाठी झटणारे पुण्याचे महादूशेठ माडीवाले कालवश, अखेरच्या प्रवासात बैलगाडा मिरवणूक
महादूशेठ माडिवाले यांची अंत्ययात्रा
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 9:10 AM

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पिंपळगाव (खडकी) गावातील बैलगाडा मालक, घड्याळ मास्टर आणि जुपनी बहाद्दर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादूशेठ गणपत पोखरकर माडीवाले (वय 70 वर्षे) यांची बैलगाडा मिरवणुकीने अंत्ययात्रा काढण्यात आली

महाराष्ट्रातील पहिली इनामी बैलगाडा शर्यत

पिंपळगाव (खडकी) गाव बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. बैलगाडा क्षेत्रात गावाचा नाव लौकिक वाढविण्यात माडीवाले परिवाराचा मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे. सन 1956 मध्ये महाराष्ट्रातील पहिली इनामी बैलगाडा शर्यत भरवण्यात या परिवाराचे योगदान होते. त्यामुळेच बैलगाडा घाटात निषाणाचे मानकरी म्हणून त्यांना बहुमान देण्यात आला.

बैलगाडा शर्यतीच्या घाटात घड्याळाचा काटा निर्णय देण्याची जबाबदारी कै. महादूशेठ पोखरकर माडीवाले यांनी समर्थपणे सांभाळली. बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला.

अखेरची सलामी देण्यासाठी बैलगाडा मिरवणूक

बैलगाडा शर्यती आज-उद्या सुरू होतील या आशेवर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा दिनक्रम सुरू असायचा. त्यांना अखेरची सलामी देण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा मालक, शेतकरी बांधव आणि पिंपळगाव ग्रामस्थांनी बैलगाडा मिरवणूकीसह अंत्ययात्रा काढून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

बैलगाडा शर्यती सुरू होऊ न शकल्याने अंत्यविधी प्रसंगी अनेक बैलगाडा मालकांनी शोकसभेत तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आणि बैलगाडा शर्यत सुरू करण्याची जोरदार मागणी केली.

बैलगाडा शर्यतींसाठी पुन्हा प्रयत्न

दरम्यान, राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा आणि शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले होते.

इतर बातम्या:

बैलगाडी शर्यत आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार, सुनील केदार यांची माहिती

VIDEO: भास्कर जाधवांकडून पंतप्रधान मोदींची मिमिक्री, म्हणाले…

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.