Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता! भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती, पावसाचे 4 मोठे अपडेट्स
Rain Update : मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई उपनगरात पावसाची रिपरिप सुरु असल्याचं पाहायला मिळालंय.
मुंबई : गेल्या दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra rains) पावसाची बॅटिंग सुरु असून नेमका आज कोणकोणत्या भागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे, तसंच पावसामुळे कोणत्या भागात काय स्थिती आहे, याचे अपडेट्स जाणून घेणार आहोत. हवामान खात्याकडून (IMD Weather Alert) जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार मुंबई, पुण्यासह (Mumbai Pune Rain) महत्त्वाच्या शहारातील आणि महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांमधील पावसाचा आढावा घेऊयात पाच मोठ्या अपडेट्समधून..
1. कुठे कुठे येलो अलर्ट?
भारतीय हवमान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुणे, जळगाव यांसह विदर्भात पावसाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यासह जळगावात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय.
15 Aug, ?? 48 hrs district level rainfall warning issued by IMD for Maharashtra. pic.twitter.com/xwb5EShhCS
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 15, 2022
2. भंडाऱ्यात पूरस्थिती
भंडार जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळाली आहे. भंडारा जिल्हाची जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहतेय. वैनगंगा नदी धोका पातळीपेक्षा 3 मीटर वाढ झाल्याने भंडारा शहराला पुराचा वेढा घातला आहे. यात विशेष म्हणजे भंडारा शहरालगत असलेल्या टाकली- खमाटा येथे पुराचे पाणी अडीच फुटावर आल्याने भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी, टप्पा मोहल्ला,खमाटा, कपिल नगर, गणेश नगरी आदी शहरालगतच्या भागात पुराचे पाणी येत असल्याने जिल्हा प्राशसनाने खबरदारी म्हणून येथील लोकांना विस्तापित केले आहे.
पाहा व्हिडीओ :
3. मुंबई :
मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई उपनगरात पावसाची रिपरिप सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान, पावसाचा मुंबईच्या जनजीवनावर कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबई नवी मुंबईसह ठाण्यात पावसाची संततधार पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
4. विदर्भात मुसळधार, गडचिरोलीत धुव्वाधार
विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने गडचिरोलीला झोडपून काढलंय. मुसळधार पावसाने नद्या-नाले दुथडी भरुन वाहत असून तब्बल 20 मार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुरामुळे जवळपास दोनशे नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आलंय.