Maharashtra Rain Update | गोड बातमी! पावसाचा मूड बदलला, हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस हवा तसा पडत नव्हता. त्यामुळे धाकधूक वाढली होती. पाऊस पडलाच नाही तर पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी आणणार तरी कुठून? असा प्रश्न होता. पण पवासाने आता बऱ्यापैकी दिलासा दिलाय.

Maharashtra Rain Update | गोड बातमी! पावसाचा मूड बदलला, हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 7:34 PM

अभिजित पोते, Tv9 मराठी, पुणे | 22 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस सक्रीय आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये सध्या चांगलाच पाऊस पडतोय. राज्यात गेल्या काही आठवड्यांमध्ये हवा तसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. शेतकरी चातकासारखे पावसाची वाट पाहत होते. अखेर गणेशोत्वसाच्या मुहूर्तावर आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडतोय. हा पाऊस आणखी किती दिवस सक्रिय असणार आणि कुठे-कुठे पडणार? याबाबत पुणे हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे 48 तास मान्सून सक्रिय राहणार आहे. राज्यातील रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरमधील काही ठिकाणी तुरळक ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित भागात मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात 25 आणि 26 सप्टेंबरला विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात छत्री घेऊनच बाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केलं आहे.

राज्यात कुठे-कुठे पाऊस पडला?

भंडारा जिल्ह्यात पावसाची बँटिंग

भंडारा जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार बॅटिंग केलीय. तर तुमसर शहरात ढगफुटीसारखा पाऊस आल्याने रस्त्यांना नदीचे स्वरुप आलं आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. तुमसर शहरातील 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक बावडी मंदिरात पाणी शिरल्याने शिवपिंड पाण्याच्या खाली गेली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाची हजेरी

अनेक दिवसांपासुन अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. काल रात्री आणि आज दुपारनंतर जिल्ह्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावलीय. कोपरगाव तसेच राहाता तालुक्यात काही भागात पावसाने जोरदार बॅटिंग केलीय. काल संध्याकाळी आणि दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे पावसासाठी आस लावून बसलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळालाय.

शहापूरसह ग्रामीण भागात पावसाची बॅटिंग सुरूच

मागील तीन-चार दिवसांपासून शहापूरसह ग्रामीण भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. सकाळपासूनच जोराचा पाऊस पडत असल्यामुळे ग्रामीण भागात सगळीकडे नदी, नाले भरल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. मात्र गणेशोत्सव सणामध्ये पाऊस सुरूच राहिल्याने भक्तांच्या आनंदावर विराजण पडल्याचे दिसत आहे.

पुण्यात जोरदार पाऊस

पुणे शहरासह उपनगरांमध्ये आज जोरदार पाऊस पडलाय. मुसळधार पावासामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. हडपसर, कात्रज, धायरी, स्वारगेट भागात जोरदार पाऊस पडतोय. पुणे शहरासह जिल्ह्याला आज आणि उद्या हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील दोन दिवस शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. दरम्यान, अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची मात्र तारांबळ उडालीय.

आणखी कुठे-कुठे पाऊस पडलाय?

इगतपुरीत आज चांगला पाऊस पडलाय. पण तरीही काही ठिकाणी अधिक पावासाची प्रतीक्षा आहे. याशिवाय बुलढाणा शहरातही चांगला पाऊस पडलाय. त्यामुळे तिथल्या येळगाव धरणात 70 टक्क्यांपर्यंत जलसाठा तयार झालाय. त्यामुळे चिंतेत असलेल्या बुलढाणा शहरातील नागरिकांचं मोठे ‘टेन्शन’ काही प्रमाणात दूर झालंय. दरणात आता मे महिन्यांपर्यंतचा पाणीसाठा जमा झालाय.

जळगावातील पारोळा तालुक्यात काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने तालुक्यातील कंकराज येथील धरण हे 100 टक्के भरलं आहे. धरण ओसंडून वाहत असल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कंकराज धरण भरल्यामुळे परिसरातील गावांमधला सिंचनाचा तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दडी मारलेली आहे. मात्र कालपासून ढगाळ वातावरण पाहावयास मिळाले. आज दुपारी आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस झाल्याने पिकांना थोडीफार का होईना, दिलासा मिळालाय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.