गौतमी पाटील हिच्या त्या ‘किस’ प्रसंगावरुन तमाशा कलाकारांचा एकत्र येऊन मोठा निर्णय

सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे तमाशा कलाकारांचा नुकताच मेळावा पार पडला. या मेळाव्यात गौतमी पाटील हिच्या परफॉर्मन्सचा विचार करुन काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

गौतमी पाटील हिच्या त्या 'किस' प्रसंगावरुन तमाशा कलाकारांचा एकत्र येऊन मोठा निर्णय
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 11:18 PM

सोलापूर | 27 जुलै 2023 : सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब हे कला केंद्रासाठी प्रसिद्ध आहे. इथे अनेक तमाशा कालाकार राहतात. मोडनिंब गावात बुधवारी कलाकार, कला केंद्र मालक आणि विविध विभागाशी संबंधित कलाकारांची महत्त्वाची बैठक पार पडली. खरंतर मोडनिंब येथे कलाकारांचा मेळावाच आयोजित करण्यात आला होता. यावेळी कलाकारांशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. या मेळाव्यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तमाशा केंद्रात यापुढे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना कलाकार म्हणून सहभागी करुन घेऊ नये, असा मोठा निर्णय घेण्यात आला.

मुलींचं शिक्षण आणि व्यक्तीमत्व विकासाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुली या सुजाण असतात. त्यांना चांगल्या-वाईटची पारख असते. त्यांना चांगलं-वाईट समजतं. त्यामुळे मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गौतमीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापैकी मंचावर नृत्य करत असताना तिने लहान मुलांच्या गालावर किस करताचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. संबंधित प्रकारावरुन अनेकांकडून चिंता व्यक्त केली जाते. तसेच लहान मुलांसोबत असं कृत्य केल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच गौतमीचे हावभाव हे देखील चर्चेला कारण ठरतात. त्यामुळे तमाशा कलाकारांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. आता लहान मुलांचा किंवा मुलींचा मंचावर वावर नको, असाच निर्णय कालाकारांनी घेतला आहे.

तमाशाच्या फडात आता डीजेवर बंदी

यावेळी एक आणखी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तमाशा फडात आता डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. तमाशा ही पारंपरिक कला पद्धत आहे. या कलेत डीजेचा वापर केल्याने काहीजणांनी ही गोष्ट म्हणजे कलंक असल्याचं म्हटलं आहे. तमाशाचं पावित्र्य जपून राहावं यासाठी डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे गौतमी पाटील हिने या निर्णयाला पाठिंबा दिल्याची माहिती मिळत आहे. कलेची अखंडता राखणे आणि त्याची पारंपारिक मुळे टिकवणं आवश्यक आहे, असंही ती म्हणाली.

गौतमी पाटील आणि वाद

गौतमी पाटील ही मंचावर नृत्य करत असताना तिच्या हावभाव यांच्यावर अनेकांचा आक्षेप आहे. तिने मध्यंतरी स्टेजवरुन केलेल्या हावभावमुळे तिच्या मंचावरील वर्तनाबद्दल अनेकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. गौतमी पाटील काही महिन्यांपूर्वी अश्लिल हावभावमुळे टीकेची धनी ठरली होती. याशिवाय तिच्या विरोधात सोलापुरातील एका आयोजकाने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे ती वादात सापडली होती.

लावणी आणि डीजे, प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय?

याबाबत प्रेक्षकांची वेगवेगळी मतं आहेत. काही प्रेक्षक तमाशा आणि लावणीचं जो पारंपारिक सार आहे तो जपून ठेवण्यासाठी आग्रही आहेत. तर काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे की, नव्या आणि आधुनिक काळानुसार आपल्याला चाललं पाहिजे. सर्वत्र डीजेवर तरुण थिरकताना दिसतात. त्यामुळे डीजेवर लावणी केली तरी त्यात वावगं काही नाही, असं काही प्रेक्षकांचं मत आहे. याबाबत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, मोडनिंब येथील तमाशा कलाकारांचा बैठकीचा महत्त्वाचा हेतू हा परंपरा आणि नाविन्य यांच्यातील समतोल राखणे, कलाकारांचा सन्मान आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करणे आणि पुढील पिढीला तमाशा आणि लावणीचा समृद्ध वारसा अभिमानाने आणि आदराने पुढे नेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता, असं कलाकारांचं म्हणणं आहे.

'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.