Weather Update : काही ठिकाणी तापमानवाढीतून दिलासा तर काही ठिकाणी उष्णतेची लाट
Maharashtra Temperature : राज्यात तापमान वाढीतून काही ठिकाणी दिलासा मिळाला आहे. परंतु विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला आहे.

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात तापमान वाढीमुळे नागरीक हैराण झाले आहेत. उष्माघातामुळे राज्यात मृत्यू होऊ लागला आहे. उष्माघातासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमान ४४ ते ४५ अंशांवर गेले आहे. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात दिलासा मिळाला आहे. पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत heat wave असणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान मोचा चक्रीवादळ तीव्र झाले असून त्यामुळे काही राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे.
मोचाचा प्रभाव, पाऊस पडणार




बंगालचा उपसागरात मोचा वादळ सक्रीय झाले आहे. हे वादळ तीव्र झाल्यामुळे ईशान्य भारतात आजपासून 16 मे पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्रिपुरा आणि मिझोराममध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 14 आणि 15 मे रोजी नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आसाम आणि अरुणाचल प्रदेशात 14 ते 16 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.
पुण्यात दिलासा पण…
वाढत्या उष्णतेपासून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी शहराचे तापमान केवळ 38 अंश सेल्सिअस होते. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचा पारा 40 वर्षाच्या वर गेलेला पाहायला मिळाला होते. मात्र काल दिवसभरात शहरात तापमानात घट झाली आहे. पुणे शहरात आजपासून मात्र उष्णतेची मोठी लाट येईल, असा अंदाज पुणे हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे.
परभणीत उन्हाच्या झळा
परभणी जिल्ह्यात तापमानाने कहर केला असून, एकाच दिवसात तापमान 41 वरून 43 अंशावर वर गेल्याने गर्मीचा जोरदार तडाखा नागरिकांना बसत आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून परभणीकरांना उन्हाचे जोरदार चटके बसत आहे. परभणीत 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात आठवडाभरापासून तापमान 40° च्या पुढे गेले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
1/ Rapid intensification of Cyclones.#CycloneMocha underwent continious rapid intensification, and is an extremely severe cyclone at about 220 km/hr maximum wind speed.
11–12 May: intensified from 65 km/hr to 120 km/hr.12–13 May: intensified from 120 km/hr to 213 km/hr. pic.twitter.com/MX8vTVU25i
— Roxy Koll ⛈ (@RockSea) May 13, 2023
नवी मुंबईत तापमान ४० वर
नवी मुंबईत आता कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. नवी मुंबईत तापमान ४० अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. अनियंत्रित बांधकामे, नवीन प्रकल्प, सिमेंट-काँक्रिटीकरण, विमानतळ विकास, औद्योगिकीकरण आणि पदोपदी तयार होत असलेले सिमेंटचे जंगल या कारणांमुळे मुंबईपेक्षा नवी मुंबईतील तापमान कमीत कमी दोन ते चार अंश सेल्सिअसने जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. सायंकाळी आणि रात्रीदेखील हवा गरम असते. त्यामुळे यंदाचा उकाडा नवी मुंबईकरांना त्रासदायक ठरत आहे. ताप, घसादुखी, पोटदुखीचा त्रास होणारे रुग्ण वाढल्याचे समोर येत आहे
Maharashtra temperature on 13 May 2023 | |
शहर | तापमान |
जळगाव | 44.9 |
अकोला | 44.5 |
मुंबई | 35.2 |
पुणे | 40.8 |
नागपूर | 42 |
नाशिक | 39.7 |
अशी घ्या काळजी
उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करिता संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा. शरीराचे तापमान १०४ फेरहाईटपर्यंत किंवा ४० डिग्री सेल्सिअस पोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे,लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्त्राव होणे तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसून येत आहे. यामुळे शारीरिक स्वास्थाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ही लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.