Sinhagad Tourism | सिंहगडावर फिरायला जाताय? मुक्कामासाठी ‘एमटीडीसी’चा बंगला उपलब्ध, अशी करा बुकिंग

| Updated on: Aug 20, 2021 | 6:19 PM

अनेकजण सिंहगडावर वन-डे ट्रिप करतात. पण आता सिंहगडावर मुक्काम करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (Maharashtra Tourism Development Corporation) सिंहगडावरचा टोलेजंग बंगला पर्यटकांसाठी उलपब्ध केला आहे.

Sinhagad Tourism | सिंहगडावर फिरायला जाताय? मुक्कामासाठी एमटीडीसीचा बंगला उपलब्ध, अशी करा बुकिंग
एमटीडीसी पर्यटन निवास, सिंहगड
Follow us on

पुणे : पावसाळ्याच्या दिवसांत आपल्यापैकी अनेकांना पर्यटनाचे (Tourism) वेध लागतात. पर्यटनस्थळांवर भटकंतीसाठी अनेकजण पसंती देतात तर काहींना ऐतिहासिक स्थळांवर जाण्याची आवड असते. अशा पर्यटकांसाठी सिंहगड (Sinhagad Fort) हे कायम फेवरेट डेस्टिनेशन राहिलं आहे. पुण्यापासून (Pune) अगदी जवळ असलेल्या सिंहगडावर पावसाळ्याच्या दिवसांत कायम पर्यटकांची रेलचेल असते. अनेकजण सिंहगडावर वन-डे ट्रिप करतात. पण आता सिंहगडावर मुक्काम करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (Maharashtra Tourism Development Corporation) सिंहगडावरचा टोलेजंग बंगला पर्यटकांसाठी उलपब्ध केला आहे. (Maharashtra Tourism Development Corporation has made the bungalow at Sinhagad Fort available to tourists)

नव्या पर्यटन धोरणानुसार बंगल्याचं नुतनीकरण

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) सिंहगडावरच्या जुन्या बंगल्याचं नुतनीकरण केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर हा बंगला पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. सिंहगडावरचा हा बंगला आधी रेव्हेन्यू वेलफेअर असोसिएशनच्या ताब्यात होता. आता राज्य सरकारच्या नव्या पर्यटन धोरणानुसार पर्यटकांच्या निवासाची दुरूस्ती करण्यात येत आहे. त्यानुसार या बंगल्याची डागडुजी करण्यात आली आहे.

पर्यटन निवासात कशी आहे सोय?

पर्यटन विभागाची इथे 32 गुंठे जागा आहे. या जागेत हा बंगला आहे. बंगल्यात 2 स्यूट, 1 व्हीआयपी स्यूट, महिला आणि पुरूषांसाठी प्रत्येकी 8-8 बेड्सचे डॉरमेटरी, 1 रेस्टॉरन्ट, 1 डायनिंग आणि स्वागतकक्षही आहे. सोबतच 3 टेन्टही उभारण्यात येणार आहेत. यातला व्हीआयपी स्यूट हा पूर्णपणे वातानुकुलीत करण्यात आला आहे. तर स्यूटमध्ये आकर्षक फर्निचर आणि स्वच्छतागृह बांधण्यात आलं आहे. पर्यटक निवासाच्या सुरक्षेसाठी दगडी भिंत बांधण्यात आली आहे.

यासोबतच इथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं संग्रहालय आणि मर्दानी खेळ खेळण्यासाठी ओपन अॅम्पीथिएटरही आहे. याठिकाणी विविध समूहांमार्फत साहसी खेळ आणि कलांची प्रात्यक्षिके दाखवण्याचं नियोजनही येत्या काळात करण्यात येणार आहे.

अशी करा ऑनलाईन बुकिंग

एमटीडीसीचं हे पर्यटन निवास सिंहगडावरच्या हवा पॉईंटजवळ आहे. एमटीडीसीच्या https://www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या बंगल्याची ऑलाईन बुकिंग करता येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर हे पर्यटन निवास पर्यटकांसाठी खुलं केलं जाणार आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO | Kashmir Tourism : काश्मीरला जायचा प्लान करताय? मग या स्थळांना नक्की भेट द्या

North India Tourist Places : उत्तर भारतात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे; येथील निसर्ग सौंदर्य पाहून हरखून जाल!

Sikkim Tourist Places : सिक्कीमला फिरण्याची योजना आखताय? मग, सिक्कीमस्थित ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!