Ajit Pawar : आमचं भविष्य ज्योतिषाकडं…, बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा; अजितदादांनी असा खुलला चेहरा

Ajit Pawar -Sharad Pawar Baramati : लोकसभेचा धडा पुन्हा विधानसभेला गिरवला जाऊ नये यासाठी अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

Ajit Pawar : आमचं भविष्य ज्योतिषाकडं..., बारामतीमधील त्या बॅनरची राज्यात चर्चा; अजितदादांनी असा खुलला चेहरा
अन् अजितदादांच्या चेहऱ्यावर आलं हसू
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 10:30 AM

भाजपने खूप प्रयत्न करूनही, मोठा दारू गोळा पेरूनही लोकसभेला बारामतीचा किल्ला काही ढासळला नाही. भाजपसह अजित पवार गटाला या किल्ल्याला सुरूंग लावता आला नाही. लोकसभेचा हा कित्ता आता विधानसभेला गिरवल्या जाऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. ते सध्या या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. त्यांनी गावागावात जाऊन थेट मतदारांच्या भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. दादांचा रोखठोक स्वभाव माहिती असल्याने गावकरी पण बिनधास्त त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचत आहेत. अजित पवार बारामती पिंजून काढत आहेत. अनेक गावांचा दौरा त्यांनी केला आहे. तर अनेक गावं त्यांच्या टप्प्यात आहेत. ते थेट मतदारांमध्ये जाऊन मतदानाचं आवाहन करत आहेत. त्यातच एका बॅनरने त्यांची कळी खुलली आहे.

दिवाळीत दादा पवार कुटुंबियांपासून अलिप्त

दिवाळीत बारामतीमध्ये पवार कुटुंबिय एकत्र येतात. अनेक वर्षांपासूनची ही पंरपरा आतापर्यंत खंडीत झाली नव्हती. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यावर सुद्धा कुटुंब एकत्र असल्याचा मॅसेज देण्यात पवार यशस्वी झाले होते. पण लोकसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना झाला. त्याचवेळी लोकांच्या मनात पाल चुकचुकली. दिवाळीत अजित दादा पवार कुटुंबियांच्या आनंदात दिसले नाही. गोविंदबागेत झालेल्या दिवाळी पाडव्यात दादा न दिसल्याने राजकारण आता घरात सुद्धा शिरल्याची चर्चा रंगली आहे. पवार कुटुंबियांपासून दादा अलिप्त झाले का? अशी चर्चा आहे. आज भाऊबीज आहे. त्यात मला लाडक्या बहि‍णींनी सकाळी ओवाळले आहे. त्यामुळे मी भाऊबि‍जेला जाणार नाही, असे अजित पवार यांनी उत्तर देत वादावर पडदा टाकला. त्यामुळे विधानसभेत पवार विरुद्ध पवार अशी चुरस दिसणार हे नक्की आहे.

हे सुद्धा वाचा

अजित दादांना मत देऊन बघा

“आमचं भविष्य ज्योतिषाकडे बघून जाऊन पाहू नका. तर अजित दादांना मत देऊन बघा. अजित दादांच्या भविष्यातील मतदार आम्ही रुईकर.” या बॅनरची सध्या राज्यभर चर्चा आहे. रुई येथील गावभेट दौऱ्यात गावकऱ्यांनी असे बॅनर झळकवल्याने दादांची कळी खुलली. अजित दादांनी स्वतः नागरिकांनी धरलेला बॅनर वाचून दाखविला.

दादा यांनी सध्या बारामती पिंजून काढण्याचा चंग बांधला आहे. ते मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. लोकसभेला नाही दिली तर आता विधानसभेला संधी द्या, असे थेट आवाहन दादांनी बारामतीकरांना केलं आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे यांना नागरिकांनी बहुमताने विजयी केले होते. आता विधानसभेला अजितदादांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.