Weather Alert: राज्यासाठी पुढील चार दिवस धोक्याचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain | मोसमी पाऊस या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Alert: राज्यासाठी पुढील चार दिवस धोक्याचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
हवामान
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 8:51 AM

पुणे: परतीचे वेध लागलेल्या मान्सूनने सोमवारी रात्री पुणे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला. अतिमुसळधार पावसामुळे अवघ्या एक ते दोन तासांमध्ये पुण्यातील अनेक भाग जलमय झाले होते. पावसाचा हा प्रचंड जोर पाहून अनेकांना धडकी भरली होती. येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या इतर भागांनाही पावसाचा असाच तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

मोसमी पाऊस या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या भागांमध्ये हायअलर्ट?

राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (5 ऑक्टोबर) रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार वापसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरुन 300-400 बाईक्सचे नुकसान

पुणे शहरात सोमवारी संध्याकाळी परतीचा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जोर इतका होता की अवघ्या दोन तासांमध्ये शहरातील अनेक भाग जलमय झाले. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. या परिसरातील तुकारामशेठ शिंदे वाहनतळाचा तळमजला अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहनतळावर लावण्यात अलेलल्या सुमारे 300 ते 400 दुचाकींचे नुकसान झाल्याचे समजते.

अतिमुसळधार पावसाने पुणेकरांची त्रेधातिरपीट उडाली

पुणे शहरात सोमवारी संध्याकाळी अतिमुसळधार पाऊस झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. पुणे शहरालगतच्या आकाशात 12 ते 15 किमी उंचीचे ढग तयार झाले होते. त्यामुळे काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरणं, प्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला होता. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा अशी सूचनाही पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. संबंधित बातम्या:

अरेरे! अतिमुसळधार पावसामुळे साचले पाणी, 300-400 दुचाकी पाण्यात बुडाल्या

Pune Heavy Rain : पुण्यात तुफान पाऊस, स्टेशन परिसरात पाणी साचलं; नागरिकांनी काळजी घेण्याचं महापौरांचं आवाहन

Pune Rain | पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस; रेल्वे स्थानक परिसरात पाणी तुंबलं

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.