VIDEO | डोंगर कोसळला आणि गावच गायब झाले, माळीण दुर्घटनेची वेदनादायी सात वर्ष

सात वर्षांपूर्वी काही क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं होतं, ते पुणे जिल्ह्यातील माळीण गाव. माळीण हे संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. यामध्ये तब्बल 151 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

VIDEO | डोंगर कोसळला आणि गावच गायब झाले, माळीण दुर्घटनेची वेदनादायी सात वर्ष
माळीण गावावर कोसळलेल्या दरडीची दृश्यं
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 11:45 AM

पुणे : 30 जुलै 2014 रोजी माळीण गावावर पहाटे काळरुपी डोंगर कोसळला अन् काहीच क्षणात होत्याचं नव्हतं. पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगराखाली गाडलं (Malin Landslied) गेलं, त्याला सात वर्ष लोटली. मात्र त्याची भीती आजही माळीणवासियांच्या मनात घर करुन बसली आहे. सात वर्षांनंतर माळीणवासियांच्या भावना काय आहेत, हे जाणून घेऊया

संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडलं

सात वर्षांपूर्वीच्या मन सुन्न करणाऱ्या पहाटेची आठवण काढली की आजही अंगावर शहारे उभे राहतात. सात वर्षांपूर्वी काही क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं होतं, ते पुणे जिल्ह्यातील माळीण गाव. माळीण हे संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. 44 घरं गाडली गेली होती. यामध्ये तब्बल 151 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 900 पेक्षा जास्त मुक्या जनावरांचाही यात मृत्यू झाला होता.

सात वर्षांनंतरही माळीणवासी धक्क्यात

या दुर्दैवी घटनेला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातच मागील आठवड्यात तळीये गावावर डोंगरकडा कोसळला आणि माळीण दुर्घटनेच्या नकोशा आठवणी ताज्या झाल्या. माळीण ते तळीये या अशा घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्यात. या आठवणी माळीण वासियांना आज वेदना देऊन जातात. आमच्यावर जी वेळ आली ती कुणावरच नको, अशी भावना माळीणवासी सात वर्षानंतरही व्यक्त करतात.

माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी 25 हजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिली आहे. त्यामुळे आपली जखम भळभळती असतानाही दुसऱ्याच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न माळीणवासी करताना दिसत आहेत

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Taliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं

Taliye Landslide : तुमचं दु:ख आम्ही जाणतो, उद्ध्वस्त तळीयेसाठी माळीणवासियांकडून मोठी मदत

(Malin Village Landslide Incident Villagers Reaction after seven years)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.