मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? मनोज जरांगे यांचा सवाल

Jarange Patil Kharadi Pune | मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची पुणे येथे सभा झाली. या सभेला समाजातील युवकांनी तुफान गर्दी केली. सभेपूर्वी बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. मराठा समाजाने अनेकांना मोठे केले. आपण ज्यांना मोठे केले ते आता आरक्षण मिळू देणार नाही, असे म्हणत आहे. यामुळे मराठ्यांना आता तरी सावध व्हा.

मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? मनोज जरांगे यांचा सवाल
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 12:08 PM

अभिजित पोते, पुणे, दि. 20 नोव्हेंबर | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रानंतर सोमवारी मनोज जरांगे पाटील यांची पुणे शहरातील खराडीत सभा घेतली. या सभेला लाखोंच्या संख्येने युवक होते. मराठा समाजाने अनेकांना मोठे केले. मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत आहे. यापूर्वी मराठा समाजासाठी नितीन करीर समिती गठीत झाली होती. परंतु त्या समितीच्या अध्यक्षांनाच माहीत नव्हते की आपण अध्यक्ष आहोत. आता आमच्या कुणबी नोंदी सापडत आहे. २९ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. मग आतापर्यंत मराठा आरक्षण कोणी लपवून ठेवले. मराठा समाजातील आरक्षणात कोण आहे झारीतील शुक्राचार्य? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

मराठा समाजाच्या मदतीसाठी कोणी येत नाही

मराठा समाजाने नेहमी सर्वांना मदत केली. कधी जातीवाद केला नाही. अडचणीच्या काळात मराठा समाजाने सर्वांना मदत केली. गेल्या ७५ वर्षांत जे जे पक्ष झाले, त्या पक्षातील सर्व नेत्यांना मोठे करण्याचे काम मराठा समाजाने केले. ज्या नेत्यांना मराठ्यांनी मोठे केले, कारण त्यांना हे नेते आपले वाटले. मराठा समाजास विश्वास होता की, कधी अडचण आली तर हे लोक मराठा समाजासाठी मदत करतील. आज आरक्षणासाठी मराठा समाजातील मुलांना आरक्षणांची गरज आहे. परंतु त्यांना कोणी मदत करत नाही. नेते मराठा समाजातील मुलांकडे बघण्यास तयार नाही.

हे सुद्धा वाचा

आरक्षण लपवणाऱ्याचे नाव द्या

आपण ज्यांना मोठे केले ते आता आरक्षण मिळू देणार नाही, असे म्हणत आहे. यामुळे मराठ्यांना आता तरी सावध व्हा. मराठा समाज मागास आहे, याचे पुरावे मिळत आहेत. राज्यात आतापर्यंत 29 लाख नोंदी सापडले आहेत. मग जर मराठा आरक्षणात होते तर 70 वर्षांपासून कुणी मराठा समाजाचे वाटोळे केले? त्याचे उत्तर आम्हाला द्या. मराठा समाजास आरक्षण कुणी मिळू दिले नाही त्याचे नाव आम्हाला द्या? मराठा समाजास आरक्षण असताना देखील कुणी लपवून ठेवले? आमचे मुडदे कोणी पाडले त्याचे उत्तर द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.