पुणेकरांची चिंता वाढली, इंग्लडहून 542 प्रवासी पुण्यात, 109 सापडेनात, दोघे कोरोनाबाधित
पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. आतापर्यंत इंग्लंडहून 542 प्रवासी पुण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल 190 प्रवाशांचा अजून पत्ताच लागलेला नाही.
पुणे : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. आतापर्यंत इंग्लंडहून 542 प्रवासी पुण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल 190 प्रवाशांचा अजून पत्ताच लागलेला नाही. हे प्रवासी सापडत नसल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे यापैकी 2 प्रवासी कोरोना बाधित निघाले आहेत. त्यांना नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे. पोलिसांच्या मदतीने आरोग्य विभागाचे अधिकारी संबंधित प्रवाशांना ताब्यात घेणार आहेत (Many passenger from England to Pune are out of contact some infected with corona).
आत्ता कुठे पुण्यातील कोरोना स्थितीवर नियंत्रण येत असल्याचं दिसत असतानाच आता पुन्हा एकदा पुणेकरांची काळजी वाढली आहे. इंग्लंडहून पुण्यात जवळपास 542 नागरिक आले आहेत. त्या प्रवाशांपैकी 109 प्रवाशांचा नोंदणी केलेल्या पत्त्यावर आणि फोननंबरवर संपर्क होत नाहीये. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ब्रिटनहून आलेल्या 542 प्रवाशांची माहिती पुणे पोलिसांना दिली. मात्र, आता पुणे पोलिसांसमोर त्यापैकी 109 जणांचा शोध घेण्याचं आव्हान आहे.
4 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची तयारी सुरु, पुण्याच्या महापौरांची मोठी घोषणा
दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी 4 जानेवारीला पुण्यात शाळा सुरु करण्याचेही संकेत दिले आहेत. असं असलं तरी त्यांनी यासाठी पालकांचं हमीपत्र आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. तसेच सध्या पालकांकडून हमीपत्र भरून देण्यास कमी प्रतिसाद असल्याचं सांगत पालकांची हमीपत्रं न आल्यास शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर फेरविचार केला जाईल असंही मोहळ यांनी नमूद केलं.
मुरलीधर मोहळ म्हणाले, “आम्ही पुण्यात 4 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची तयारी करतो आहे. पण पालकांकडून अद्याप हमीपत्र भरून द्यायला अत्यंत कमी प्रतिसाद आहे. पालकांची हमीपत्रं आली नाहीत, तर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुन्हा फेरविचार करणार आहे.”
आता वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणि इंग्लंडहून येणाऱ्या प्रवाशांच्या या घटनांनंतर पालिका प्रशासन शाळा सुरु करण्याबाबत काय निर्णय घेतंय हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
4 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची तयारी सुरु, पुण्याच्या महापौरांची मोठी घोषणा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणेकरांनो काळजी घ्या, अजित पवार यांचं आवाहन
व्हिडीओ पाहा :
Many passenger from England to Pune are out of contact some infected with corona