Pune News | नक्षली संजय राव याच्यावर होता २ कोटींचे होते बक्षिस, काय आहे पुणे कनेक्शन

Pune News | बीटेकची पदवी घेऊन नक्षली चळवळीत सक्रीय असलेला संजय राव आणि त्याची पत्नी मुरुवापल्ली राजी उर्फ सरस्वती याला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. संजय राव याच्यावर दोन कोटींचा पुरस्कार होता. त्याचे पुणे कनेक्शन काय आहे...

Pune News | नक्षली संजय राव याच्यावर होता २ कोटींचे होते बक्षिस, काय आहे पुणे कनेक्शन
sanjay rao naxalite
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 2:14 PM

पुणे | 19 सप्टेंबर 2023 : तेलंगणा पोलिसांनी जहाल नक्षली कमांडर संजय राव उर्फ दीपक (59) आणि त्याची पत्नी मुरुवापल्ली राजी उर्फ सरस्वती याला अटक केली. पोलिसांचे हे मोठे यश आहे. महाराष्ट्र सरकारसह विविध राज्यातील सरकारने त्याच्यावर बक्षिसे ठेवली होती. त्याच्यावर एकूण दोन कोटी रुपयांचे बक्षिस होते. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील रहिवाशी असलेला संजय राव नक्षली नेता आणि सेंट्रल कमेटीचा सदस्य आहे. तो पश्चिम घाट कमांडर आहे. या दोघांच्या अटकेमुळे नक्षली चळवळीला मोठा धक्का बसला आहे. एका बैठकीसाठी हैदराबादला आला असताना त्याला अटक करण्यात आली.

बीटेक करत असताना आला फुटीरवाद्यांच्या संपर्कात

संजय राव 1983 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये बीटेक करत होता. त्यावेळी तो स्वतंत्र काश्मीरची मागणी करणाऱ्या फुटीरवाद्यांच्या संपर्कात आला. संजय राव याचे वडील डाव्या विचारांचे होते. त्यामुळे संजय राव याच्यावर सुरवातीपासून डाव्यांचा प्रभाव होता. 1999 मध्ये नक्षली चळवळीचे नेते कोनाथ मुरलीधरन उर्फ अजित यांनी नक्षली समूहाची स्थापना केली. त्याला संजय राव यांनी समर्थन दिले. ते ही या समूहात दाखल झाले.

काय आहे पुणे कनेक्शन

संजय राव याने महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूत नक्षली चळवळीचा विविध पदावर काम केले.संजय राव नेहमी पुणे, मुंबईत येत होता. 2015 मध्ये पुणे येथील तळेगाव दाभाळे येथे त्याला अटक झाली होती. 30 वर्षापासून जास्त काळ नक्षली चळवळीत संजय राव याने काम केले. संजय याची पत्नी सरस्वती 1999 मध्ये नक्षली चळवळीत सहभागी झाली. 2007 मध्ये त्यांचे लग्न झाले.

हे सुद्धा वाचा

अशी झाली अटक

संजय राव चार दिवसांपूर्वी अबुजमाड जाण्यासाठी हैदराबादला आला होता. त्याठिकाणी आपल्या जुन्या मित्राची त्याने भेट घेतली. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली आहे. त्यानंतर त्याला अटक झाली. संजय राव याची अटक म्हणजे नक्षली आंदोलनाला मोठा झटका समजला जाणार आहे. मागील वर्षी सेंट्रल कमिटेचे सदस्य मिलिंद तेलतुंबडे एका चकमकीत ठार झाला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.