मराठा आंदोलक आक्रमक, गावबंदीमुळे अजित पवार यांनी कार्यक्रम टाळला

Ajit Pawar | आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावबंदीच्या या निर्णयाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाही बसला आहे. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमास जाणे टाळले आहे.

मराठा आंदोलक आक्रमक, गावबंदीमुळे अजित पवार यांनी कार्यक्रम टाळला
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 12:12 PM

नविद पठाण, बारामती, पुणे | 28 ऑक्टोंबर 2023 : राज्यात सर्वत्र मराठा समाजाकडून आंदोलन सुरु आहे. एकीकडे जालनामधील अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्याचवेळी राजकीय नेत्यांना सर्वत्र गावबंदी केली जात आहे. राज्यातील अनेक गावांनी हा निर्णय घेतला आहे. या गावबंदीच्या निर्णयाचा फटका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बसला आहे. अजित पवार शनिवारी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करणार होते. परंतु गावबंदीच्या निर्णयामुळे त्यांनी या कार्यक्रमास जाणे टाळले आहे. सकल मराठा समाजाकडून अजित पवार यांनी गावात येऊ नये, अशी भूमिका घेतली होती.

अजित पवार यांनी पाठवला निरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. परंतु राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजकीय नेत्यांना गावबंदी असल्यामुळे माळेगावात अजित पवार यांनी कार्यक्रमास न जाण्याचा निर्णय घेतला. आपल्याऐवजी एखाद्या शेतकऱ्यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करा, असा निरोप अजित पवार यांनी कारखान्याच्या चेअरमन यांना पाठवला.

आंदोलनामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त

राज्यात मराठा सामाजास आरक्षण देण्याची मागणी मान्य झाली नाही. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाने साखळी उपोषण सुरु केले आहे. तसेच राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. यामुळे माळेगावत अजित पवार येणार असल्यामुळे कारखाना परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचवेळी मराठा समाज आपल्या भूमिकेवर ठाम होता. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून अजित पवार यांनी कार्यक्रमास जाणे टाळले. शनिवारी दौरा रद्द केल्यानंतर अजित पवार आपल्या पुण्याच्या घरी दखल झाले.

हे सुद्धा वाचा

लातूरमध्ये पाण्यात उतरून आंदोलन

लातूर जिल्ह्यातील नागझरी येथे मांजरानदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या या आंदोलनात महिलांची देखील सहभाग घेतला. आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मराठा आरक्षणाची मागणी करीत हे आंदोलक बराच वेळ मांजरा नदी पात्रात उभे होते.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.