Sharad Pawar | सर्वात मोठी बातमी, पुण्यात शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आलीय. काही आंदोलक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

Sharad Pawar | सर्वात मोठी बातमी, पुण्यात शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 3:45 PM

अभिजित पोते, Tv9 मराठी, पुणे | 24 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात मराठा आंदोलनकर्त्यांकडून पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शरद पवार टिळक स्मारक मंदिरातील सभा आटोपून आपल्या निवासस्थानाकडे निघाले होते. यावेळी पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे यावेळी मराठा कार्यकर्त्यांकडून ‘शरद पवार गो बॅक’ अशा आशयाचे पोस्टर दाखवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी शरद पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पण या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.

मराठा आरक्षणाचा प्रश्नावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या 40 दिवसांचा कालावधी आज संपतोय. त्यामुळे आता आरक्षण लागू झालं नाही तर मनोज जरांगे पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत. याशिवाय मराठा कार्यकर्तेदेखील आता आक्रमक होत आहेत.

मराठा कार्यकर्त्यांनी नुकतंच काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आज शरद पवार यांच्या ताफ्याला अडवण्याचा आज प्रयत्न झालाय. अजित पवार यांनी आपल्या भाषणात मनोज जरांगे यांच्या सभेबाबत बोलताना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नागरीकही जरांगे यांच्या सभेला का जातात? असा सवाल केला होता. यावरुन मनोज जरांगे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर आज मराठा कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय.

याआधीसुद्धा शरद पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

मराठा कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केल्याची ही पहिली घटना नाही. याआधीदेखील मराठा समाजाच्या तरुणांकडून मनोज जरांगे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झालाय. मनोज जरांगे यांचं त्यांच्या जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरु होतं तेव्हा शरद पवार स्वत: उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते.

शरद पवारांनी मनोज जरांगे यांचं कौतुक केलं होतं. तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आपल्या पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी शरद पवारांनी अंतरवली सराटी गावात लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांची दवाखान्यात जावून भेट घेतली होती. शरद पवार अंतरवली सराटी येथून परतत असताना मराठा कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव शरद पवार यांच्या ताफ्याच्या मार्गात बदल केला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.