manoj jarange patil | मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात तोफ धडाडणार…सभेसाठी अशी तयारी

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे निघालेले वादळ आता पुणे जिल्ह्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांची राजगुरुनगर आणि बारामतीत सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

manoj jarange patil | मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात तोफ धडाडणार...सभेसाठी अशी तयारी
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 8:10 AM

पुणे | 20 ऑक्टोंबर 2023 : मराठ्यांना आरक्षण मिळाले तर जल्लोष होईल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, असा इशारा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून सरकाराला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता. 14 ऑक्टोबर रोजी दिलेल्या या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तोफ पुणे जिल्ह्यात 20 ऑक्टोंबर रोजी धडाडणार आहे. यानिमित्त शुक्रवारी पुन्हा लाखो मराठा तरुण आरक्षणासाठी एकत्र येणार आहे. पुणे जिल्ह्याचा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा शिवनेरी किल्ल्यापासून सुरु झाला. त्यानंतर राजगुरुनगर आणि बारामतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.

सभेसाठी काय झाली तयारी

पुणे येथील राजगुरुनगरमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेसाठी 100 एकर जागा घेण्यात आली आहे. सभेसाठी भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, ठिकठिकाणी एलईडी स्किन, जनरेटरची व्यवस्था असे मोठे नियोजन सभेसाठी करण्यात आले आहे. तीन जनरेटरच्या माध्यमातून सभास्थळी विद्युत पुरवठा केला जात आहे. या ठिकाणी इंटरनेटची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

मंडप विनामूल्य

सध्या नवरात्र उत्सव सुरु आहे. त्यासाठी मंडपाला मोठी मागणी आहे. परंतु वैभव कोतवाल यांनी सभेसाठी विनामूल्य मंडप उपलब्ध करुन दिले आहे. सभास्थळी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी नाश्ता, पाण्याचे नियोजन केले आहे. यासाठी दानशूर व्यक्तींकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे सर्वांना मोफत नाश्ता, पाणी मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

सभेत काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून सराकारला अल्टीमेटम दिला होता. आता मराठा आरक्षणासाठी फक्त चार दिवसांचा कालावधी राहिला आहे. यामुळे पुणे येथील सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. राजगुरुनगरमधील सभेनंतर जरांगे पाटील हे बारामतीत दाखल होणार आहेत.

55 रुग्णवाहिका सभास्थळी असणार

पुण्याच्या राजगुरुनगर येथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेनिमित्ताने खेड, आंबेगाव, जुन्नर रुग्णवाहिका असोसिएशनतर्फे 55 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर हिट लक्षात घेऊन रुग्णवाहिकेत व्यवस्था करण्यात आली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.