बारामतीत अल्पवयीन मुलाचा देवी बरोबर विवाह; अंनिस आणि पोलिसांनी मध्यस्थी करुन रोखले
गेनमाळ म्हणजे देवी बरोबर लग्न लावणे. बारामती शहरानजीक असलेल्या गुनवडी येथे एका 11 वर्षाच्या मुलाचा गेनमाळ बांधण्याच्या कार्यक्रमाची पत्रिका अंनिसच्या नंदिनी जाधव यांना मिळाली. त्यानंतर जाधव या कार्यक्रमाची अधिक माहिती घेतली.
बारामती : अंधश्रद्धेने कळस गाठल्याचा प्रकार आज बारामतीत उघडकीस आला आहे. गुणवडी येथे एका पोतराजाच्या 11 वर्षाच्या मुलाचा देवीसोबत विवाह (गेनमाळ) लावण्यात येणार होता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बारामती पोलीसांनी मध्यस्थी करीत हा विवाह रोखला. पोलिस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संबंधित कुटुंबाचे समुपदेशन करीत सदर प्रकार थांबवण्यात यश आले आहे. एका गुरुच्या सांगण्यावरुन हा विवाह करण्यात येत होता.
अंनिसच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीवरुन कारवाई
गेनमाळ म्हणजे देवी बरोबर लग्न लावणे. बारामती शहरानजीक असलेल्या गुनवडी येथे एका 11 वर्षाच्या मुलाचा गेनमाळ बांधण्याच्या कार्यक्रमाची पत्रिका अंनिसच्या नंदिनी जाधव यांना मिळाली. त्यानंतर जाधव या कार्यक्रमाची अधिक माहिती घेतली. त्यानंतर नंदिनी जाधव यांनी संपूर्ण प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिला. देशमुख यांनी शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांना याबाबत सूचना दिल्या. सीडब्ल्यूसीचे परमानंद यांनाही या बाबत कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली.
विवाहासाठी 400 लोकांना आमंत्रित केले होते
पोलीस तक्रारीनंतर मुलाच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तेथे मुलाच्या वडिलांची चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र ज्या गुरुजीने त्यांना हा विधी करण्यास सांगितले होते. त्या गुरुजीने पोलिसांसमोर शब्द पलटला आणि या प्रथेच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच पोलिसांनी मुलाच्या घरच्यांना बाल संरक्षण हक्क कायद्याची माहिती देत त्यांचे समुपदेशन केले. यानंतर मुलाच्या वडिलांनी ही प्रथा पाळणार नसल्याचे कबुल केले. यामुळे हा विवाह रोखण्यास पोलिसांना यश आले. या गेनमाळ कार्यक्रमासाठी 400 लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच या विवाहाच्या खर्चासाठी मुलाच्या वडिलांनी कर्जही काढले होते. वेळीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांना याची माहिती मिळाल्यामुळे कर्जही टळले आहे. (Marriage of a minor child with Goddess in Baramati, Annis and the police intervened and stopped)
इतर बातम्या
मुंबई विमानतळावर तब्बल 3 हजार 646 आयफोन जप्त! किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क
मुंबईत क्रूरतेचा कळस : युवतीवर आधी बलात्कार, चाकूने 26 वार, मग हातोडीने डोके फोडले