Gajanan Babar| मावळचे पहिले शिवसेना खासदार गजानन बाबर यांचे निधन ; 79 वर्षी घेतला अखेरचा श्वास

गजानन बाबर यांनी पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची पहिली शाखा उघडली होती. 2009 मध्ये ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांना 2014  च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा दिला होता.

Gajanan Babar|  मावळचे पहिले शिवसेना खासदार गजानन बाबर यांचे निधन ; 79  वर्षी घेतला अखेरचा श्वास
Gajanan Babar
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 5:55 PM

पिंपरी –शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार गजानन धरमसी बाबर ( (Former MP Gajanan Babar)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आज बुधवारी दुपारी चार वाजता बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षाचे होते. मागील तीन महिन्यांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. पोटाच्या विकारामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मागील दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची(Corona) लागण झाली होती. यामुळं त्यांची तब्येत बिघडत गेली. उद्या सकाळी 11वाजता निगडी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.   पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना  उभी करण्यात बाबर यांचे मोठे योगदान होते .

असा होता राजकीय प्रवास मधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते गजानन बाबर यांनी पिंपरीतील काळभोर नगर येथे शिवसेनेची पहिली शाखा सुरु केली. तिथून पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेच्या वाढीस सुरुवात झाली. गजानन बाबरयांना राजकारणातील एक अभ्यासू , लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जायचे. काळभोरनगर प्रभागातून तीन वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यानंतर हवेली तालुक्यातून त ते दोन वेळा आमदार म्हणून निवडणून आले. पुढे पूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ रद्द झात्यानंतर तयार झालेल्या मावळ मतदार संघातून गजानन बाबर हे शिवसेनेचे पहिले खासदार म्हणून निवडून आले .  त्यानंतर त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर बाबर यांनी 2016मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु तेथेही मन रमल्याने त्यांनी 2019 मध्ये पुन्हा शिवसेनेते प्रवेश केला होता.

गजानन बाबर यांचा राजकीय प्रवास

  • महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक राहिले.
  • महापालिकेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली.
  • हवेली विधानसभेतून ते शिवसेनेच्या तिकिटावर आमदार होते.
  • मावळ लोकसभेची निर्मिती होताच ते पहिले खासदार म्हणून निवडून आले

नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी, कणकवली कोर्टाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

Goa Assembly Elections : आम आदमी पार्टीचंही काँग्रेसच्या पावलावर पाऊलं, गोव्यात उमेदवारांना दिली शपथ

Noida IT Raid: माजी आयपीएसच्या बंगल्यातील तळघरात 700 लॉकर्स, 5.77 कोटींची रक्कम जप्त

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.