भाजपने मेधा कुलकर्णी यांना का दिली उमेदवारी? आता बदलणार पुणे लोकसभेची गणिते

Pune Lok Sabha Election medha kulkarni | भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन नाराज झालेल्या ब्राह्मण समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी संधी दिल्याने पुणे लोकसभेची गणिते आता बदलणार आहेत.

भाजपने मेधा कुलकर्णी यांना का दिली उमेदवारी? आता बदलणार पुणे लोकसभेची गणिते
medha kulkarni
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 10:19 AM

अभिजित पोते, पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2024 | पुणे कोथरुड मतदार संघात आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांना भाजपने न्याय दिला. मागील विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांकडून काही वेळा नाराजी व्यक्त केली गेली होती. परंतु मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे कधी नाराजी व्यक्त केली नाही. त्यामुळे त्यांना एकनिष्ठतेचे बक्षीस दिले. आता थेट राज्यसभेसाठी संधी त्यांना दिली आहे. यामुळे पुणे लोकसभेची गणिते बदलणार आहेत.

मराठा उमेदवार देणार

राज्यसभेसाठी पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन ब्राम्ह्यण मतदारांची नाराजी दूर केली आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे मतदार संघातून भाजप आता मराठा उमेदवार देण्याची शक्यता जास्त आहे. आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे. या सर्व इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेसाठी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे.

का दिली मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी

भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन नाराज झालेल्या ब्राह्मण समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी संधी दिल्याने पुणे लोकसभेची गणिते आता बदलणार आहेत. पुणे लोकसभेतून ब्राह्मण उमेदवार गिरीश बापट खासदार होते. त्यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली नाही.

हे सुद्धा वाचा

परंतु कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने लढवली. यावेळी ब्राह्मण उमेदवार दिला नाही. हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यांचा पराभव रवींद्र धंगेकर यांनी केला होता. कारण नाराज झालेला ब्राह्मण समाज रासने यांच्या पाठिशी उभा रहिला नाही. आता मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्यामुळे ब्राह्मण समाजाची नाराजी दूर झाली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.