वीज गेली, भाषण थांबलं, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, अजित पवार म्हणाले, साताऱ्याच्या सभेनं दाखवून दिलंय !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वर्चस्व असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात सध्या निवडणुकीचं वातवरण आहे. येत्या 12 ऑक्टोबरला मतदान असणार आहे. तर 14 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.

वीज गेली, भाषण थांबलं, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, अजित पवार म्हणाले, साताऱ्याच्या सभेनं दाखवून दिलंय !
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 9:59 PM

पुणे : सोमेश्वरसाठी 12 तारखेला मतदान होणार आहे. वीज गेली.. भाषण थांबलं.. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. बारामती, पुरंदर, फलटण, खंडाळा तालुक्यात सोमेश्वरचं कार्यक्षेत्र आहे. मतदानादिवशी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने तसा अंदाज वर्तवलाय. प्रचारासाठी फार कमी कालावधी मिळाला आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. कार्यकर्ते म्हणाले सकाळी 7 वाजता.. अजितदादा म्हणतात ठिकंय सकाळी 7 काय किंवा रात्री 10 काय.. कोण माझ्याइतकं सकाळी लवकर उठून प्रचाराला येणार असा सवाल अजित दादांना केला. पाऊस सुरु आहे. बाहेरील बाजूच्या लोकांची गैरसोय होतेय. पण थोडं भिजा.. पावसात भिजलं तर काय होतं हे साताऱ्याच्या सभेनं दाखवून दिलंय.. त्यामुळं पाऊस येणं हे शुभशकुन आहे, असे पुणे जिल्ह्यातील सोमेश्वरनगर येथील प्रचारसभेतील भाषणात अजित पवार म्हणाले. (Meeting of Ajit Pawar on the background of election of Someshwar Sahakari Sugar Factory)

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वर्चस्व असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात सध्या निवडणुकीचं वातवरण आहे. येत्या 12 ऑक्टोबरला मतदान असणार आहे. तर 14 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा वेळ आज समाप्त होतोय. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोमेश्वरनगरमध्ये आले होते. यावेळी कारखाना परिसरातच त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी राज्यासह देशभरात घडणाऱ्या विविध घटनांवर भाष्य केलं. काही घटनांवर त्यांनी मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिली. तर काही घटनांवर आपलं मत मांडताना पोटतिडकीने काही विषय मांडले.

‘उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होवू नका’

“उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होवू नका. गावातलं राजकारण या निवडणुकीत आणू नका. काहींनी चुकीचे फलक लावले. त्यावर बातम्या झाल्या. बारामती म्हटलं की बातमी मोठी होते. जर माझे नेतृत्व कोणाला मान्य नसेल तर माझ्या पक्षात राहू नका. माझ्यापेक्षा कोणी कर्तृत्ववान असेल तर तिकडे जा. माझी नाहक निंदा नालस्ती का करता? कोणी काय केलं? कुणाच्या बैठका झाल्या? हे सगळं माहितीये. तुम्हाला पॅनलमध्ये घेतलं तर अजित पवार चांगला आणि पॅनलमध्ये नाही घेतलं तर वाईट हे असलं खपवून घेणार नाही. लोकं जेवायला बोलवतात, जेवायला घालतात आणि निघून गेलं की चुकीचं वागतात”, असं अजित पवार म्हणाले.

‘कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सभा’

“मला खरंच खूप व्याप आहेत. पण केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आज सभा घेतली. सोमेश्वरला मदत नाही झाली तर इतर ठिकाणी संधी देवू, असा शब्द दिला होता. पण तरीही काहींनी चुकीचं काम केलं. सोमेश्वरच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करा. उगाच क्रॉस वोटींग करु नका. अजिबात गहाळ राहू नका. समोरचं पॅनल मजबूत आहे असं समजूनच काम करा. तुमच्या ऊसाला चांगला दर मिळवायचा असेल तर आम्हाला साथ द्या”, असं आवाहन अजित पवारांनी केलं. (Meeting of Ajit Pawar on the background of election of Someshwar Sahakari Sugar Factory)

इतर बातम्या

मग मुख्यमंत्री तरी कशाला गप्प बसतील, राणेंची टीका, अजित पवारांची बारामतीच्या सभेत टिप्पणी

‘महाराष्ट्र बंद’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : नाना पटोले

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.