पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात ‘PCMC ते फुगेवाडी’ मार्गावरून धावणार मेट्रो
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी या मार्गावर एकूण पाच स्थानकांचा समावेश आहे. दोन स्थानकांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित स्थानकांचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यात येणार
पुणे- शहरातील पुणे महामेट्रोबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. येत्या जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गावर मेट्रो धावणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गावर महामट्रो सुरूवातीला दररोज दैनंदीन पद्धतीने चालवली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी या मार्गावर एकूण पाच स्थानकांचा समावेश आहे. त्यामधील दोन स्थानकांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित स्थानकांचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
- महामेट्रोमध्ये एकूण 30 स्थानकांचा समावेश आहे.
- दोन कॉरिडॉरमध्ये विभागणी
- PCMC ते स्वारगेट कॉरिडॉर 17.4 किमी लांब
- वनाज ते रामवाडी कॉरिडॉर15.4 किमी लांब
- शिवाजीनगर ते स्वारगेट असा 6 किमीचा भुयारी(Underground) मार्ग
- वनाज ते रामवाडी उंचावली (Elevated)
हरित संवर्धन उपक्रम महामेट्रोच्या कामादरम्यान हरित संवर्धनाचे उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर, पाण्याची साठवण, बायोडायजेस्टर, वृक्षारोपण केले आहे. रूट-बॉल तंत्रज्ञानाच्या (root-ball technology) मदतीने मेट्रो मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. ही झाडे विविध उद्यानात लावण्यात आली असून त्यातील 80 टक्के झाडे जगली आहेत. आतापर्यंत 2261 झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त पुणे मेट्रोने पुणे शहर आणि आजूबाजूच्या विविध ठिकाणी 15,000 हून अधिक नवीन झाडे लावली आहेत.
संबंधित बातम्या :
भाजप नेत्यांना साखरराजकीय मतभेद विसरून वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय ‘दिवाळी फराळ’
आयुक्तांचा दणका, FRP न दिल्यानं गाळप परवाने रोखले; शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांचाही समावेश
इन्स्टावर ओळख, परदेशात पायलट असल्याचं सांगून पुणेकर महिलेला 10 लाखांना गंडा