पुण्यातील टेकड्यांबाबत मोठा निर्णय, आता 17 टेकड्यांवर अशी होणार उपाययोजना
mhatoba tekdi pune: पुण्यातील एका टेकडी निमित्ताने सगळ्या टेकड्यांचा प्रश्न समोर आला आहे. सुरक्षा रक्षक वाढवणे त्यांना गाड्या देणे त्याचे मॉनिटरिंग करावे लागणार आहे. सगळ्या टेकड्यांवर हा विषय करावा लागणार आहे.
mhatoba tekdi pune: पुणे शहरात एकूण 17 टेकड्या आहेत. या सर्व टेकड्या वन विभागाच्या अंतर्गत येतात. त्या टेकड्यांचे क्षेत्रफळ किती? टेकड्यांवर झाडे किती? या सर्वांची माहिती घेण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले. ते म्हणाले, म्हातोबा टेकडीवर तीन आगीच्या घटना घडल्या. त्यात अडीच हजार झाडाचे नुकसान झाले. त्यामुळे टेकड्यांवर सीसीटीव्ही लावणे, गार्ड नेमणे, ग्राउंडवर टॉवर उभे करणे, गवत साचून न देणे, मशीनच्या साह्याने गवत काढणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सर्व टेकड्यांचे प्रश्न समोर
चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यातील एका टेकडी निमित्ताने सगळ्या टेकड्यांचा प्रश्न समोर आला आहे. सुरक्षा रक्षक वाढवणे त्यांना गाड्या देणे त्याचे मॉनिटरिंग करावे लागणार आहे. सगळ्या टेकड्यांवर हा विषय करावा लागणार आहे. आता मी थांबणार नाही. टेकड्यांवर गैरप्रकार करणाऱ्या कोणाला सोडू नये. माध्यमांनी यासंदर्भात जागृत राहिले पाहिजे. त्याबरोबर टेकड्यांवर होणारे अतिक्रमण किंवा इतर गोष्टीवर चर्चा बैठकीत चर्चा झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका कधी?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला की प्रक्रिया सुरू होईल. नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर 22 तारखेला सुनावणी होणार आहे. बीड प्रकरणात एसआयटी सगळे काम करत आहे. तपास संस्थांनी देशमुख कुटुंबियांना बोलावले नाही. पण त्यांचे काम सुरु आहे. आरोपींवर कारवाई होत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेते रमेश परदेशी यांनी वेताळ टेकडीवरील अल्वपयीन मुलीने केलेल्या प्रकाराचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ती अल्वपयीन मुलीने अंमलीपदार्थाचे सेवन केले होते. त्यांनी म्हटले होते की, मनाला झालेल्या वेदनाही व्हिडिओतून दिसत आहेत. प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.