मोठी घोषणा! सरकार महिलांना 4 तासांचा पार्ट टाईम जॉब आणि 11,000 पगार देणार

राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून सरकार महिलांना थेट टाटा कंपनीत जॉब देणार आहे. तसेच महिलांना एकवेळचं जेवण आणि नाष्टा देखील असणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे गरजू महिलांना मोठा फायदा होणार आहे.

मोठी घोषणा! सरकार महिलांना 4 तासांचा पार्ट टाईम जॉब आणि 11,000 पगार देणार
मोठी घोषणा! सरकार महिलांना 4 तासांचा पार्ट टाईम जॉब आणि 11,000 पगार देणार
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 9:51 PM

पुण्याच्या कोथरूडमध्ये 7 हजार पेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजन संपन्न झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या पूजन पार पडले. राज्यात प्रथमच असा भव्य-दिव्य कन्यापूजन सोहळा पाक पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले. दरवर्षी 1 लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच 1 नोव्हेंबर पासून 1 हजार माता-भगिनींना 11 हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी दुसरी मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिली.

“दोन गोष्टी आहेत, आज 5 हजार मुलींना लाठी-काठीचं प्रशिक्षण दिल्यानंतर मी 1 लाख मुलींचं टार्गेट मानणारी घोषणा केली. या लाठी-काठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन देणार आहे. हे 10 हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीने दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावं. आता 27 मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री या सहासी खेळाडूंवर आली आहे, ज्यांना पारितोषिक मिळालं आहे. कोल्हापूरच्या तरुणाने ती केली. कोल्हापूरच्या गल्लोगल्लीत सर्वांच्या हातात काठ्याच असतात. त्यामुळे ती एक घोषणा केली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 10-11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

4 तासांचा पार्ट टाईम जॉब, 11 हजार पगार, थेट टाटा कंपनीत नोकरी

“मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1 हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील, 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणं-येणं फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला. मी या निमित्ताने त्याचं नाव सांगेन. दुर्दैवाने कालच त्यांचं निधन झालं. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना 11 हजार रुपये महिनांची थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“माझी खात्री अशी आहे की, ही संकल्पना संपूर्ण देशभरात रुजेल. त्यातून जॉबही निर्माण होतील. चार तासांचे जॉब असल्याने जास्त महिला काम करतील, चार तासांचे जॉब असल्याने जास्त ती घरालाही न्याय देईल. अशा दोन घोषणा मी आज केल्या”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.