ओळखीच्या तरुणाकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार

काही दिवसांपूर्वी त्या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यावेळी मुलीच्या आईने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासण्या करुन घेतल्या. त्यात ती २८ आठवड्यांची गर्भवती असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं.

ओळखीच्या तरुणाकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार
9 बालिकेवर अत्याचार करत हत्याImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 1:56 PM

पुणे : महिला सुरक्षेसंदर्भात मागील सरकारने विधानसभेत शक्ती विधेयक (shakti videyak) मंजूर केले होते. बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा आणि ऑसिड हल्लेखोरांना १५ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा या कायद्यात करण्यात आली आहे. म्हणजेच महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे कठोर केले गेले आहे. परंतु त्यानंतरही महिलांवर अत्याचाराच्या (rapc cases) घटना कमी होत नाही. अगदी ओळखीच्या लोकांकडूनही अत्याचार होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. पुणे सांस्कृतिक शहर, शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या अत्याचारात घटना पुणे शहर व परिसरात वाढत आहे. एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार केल्याच्या घटनेनंतर पुणे शहर हादरले आहे.

पुणे येथील वानवाडी भागात १९ वर्षीय तरुण व १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेजारी शेजारी राहते. तरुणाने त्या मुलीला खेळण्याच्या बाहण्याने बोलवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. “माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आपण लग्न करू” असे सांगत त्या तरुणाने अनेक वेळा अत्याचार केला.

हे सुद्धा वाचा

अशी उघड झाली घटना तरुण व अल्पवयीन मुलीसंदर्भात हा सगळा प्रकार किमान सहा महिने सुरु होता. काही दिवसांपूर्वी त्या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यावेळी मुलीच्या आईने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिच्या सर्व तपासण्या करुन घेतल्या. त्यात ती २८ आठवड्यांची गर्भवती असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं. हे ऐकून मुलीच्या आईला धक्का बसला. तिने मुलीकडे विचारणा केली असता प्रकार उघड झाला. आता या घटनेसंबधी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार जानेवारी ते जून २०२२ दरम्यान घडला असल्याचे समोर आले आहे.

मागील आठवड्यात आजोबाच्या नातीसंदर्भातील प्रकार उघड ६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. पीडित मुलगी ४ थी मध्ये शिकत आहे. तिच्या शाळेत शाळेतील बॅड टच आणि गुड टच म्हणजेच समुपदेशनाचा कार्यक्रम सुरु होता.त्यावेळी सगळ्या विद्यार्थीनी आपआपले प्रसंग सांगत होत्या. एका मुलीने तिचे सख्ये आजोबा तिच्यासोबत कसे घाणरडे वर्तन करत होते, ते सांगितले. यावेळी शिक्षिकेलाही हादरा बसला. त्या मुलीने डिसेंबर महिन्यात तिच्या बरोबर घडलेला प्रकार सांगितला. “जेव्हा कोणी घरात नसते तेव्हा आजोबा गोदीत बसवत आणि…” असे सांगत या चिमुरडीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली.आजोबा आधी अश्लील व्हिडिओ दाखवत होते. त्यावेळी मी ओरडले तर ते माझे तोंड दाबून मला गप्प करायचे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.