खवय्यांनो ओळखा, जगातील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थात कोणत्या महाराष्ट्रीयन पदार्थाने मारली बाजी

TasteAtlas : जगातील सर्वात चांगला शाकाहारी पदार्थ तुम्ही खाल्लाच असणार? या पदार्थाला जगात पहिला क्रमांक मिळाला आहे. आनंदाची बाब म्हणजे हा पदार्थ महाराष्ट्रातील आहे अन् शहर असो की खेडे सर्व ठिकाणी लोकप्रिय आहे.

खवय्यांनो ओळखा, जगातील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थात कोणत्या महाराष्ट्रीयन पदार्थाने मारली बाजी
misal pavImage Credit source: tv9 network
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 12:27 PM

पुणे : तुम्हाला विविध पदार्थ खाण्याची आवड आहे का? अनेकांचे नाही तर जवळपास सर्वांचे उत्तर होय येईल. मग जगातील सर्वात चांगला खाद्य पदार्थ कोणता? हा प्रश्न विचारल्यावर अनेक उत्तर येतील. परंतु टेस्टअटलास (TasteAtlas) या वेबसाईटकडून एक यादी जाहीर केली आहे. त्यात जगातील सर्वोत्तम ५० पदार्थांची नावे या यादीत आहे. शाकाहारी पदार्थांमध्ये महाराष्ट्रातील अर्थात पुणे अन् नाशिकमधील सर्वात लोकप्रिय पदार्थांचा समावेश केला आहे. जगातील सर्वोत्तम शाकाहारी पदार्थ हा महाराष्ट्रातील पदार्थ ठरला आहे. भारतात क्रमांक एकवर तर जगात ११ व्या क्रमांकावर आहे.

कोणता पदार्थ आहे

हे सुद्धा वाचा

जगातल्या सर्वात चांगल्या शाकाहारी पदार्थात इराणमधील zeytoon parvardeh या पदार्थाने पहिला क्रमांक पटकवला आहे. अकराव्या क्रमांकावर भारतातील पदार्थ आहे. शाकाहारी पदार्थांच्या क्रमांकात भारतातील हा पदार्थ  देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हा पदार्थ म्हणजे पुणे नाशिकमधील सर्वात लोकप्रिय मिसळ पाव. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच मिसळ आवडते. घराघरात हा लोकप्रिय प्रकार आहे. मिसळ पाव महाराष्ट्रीयन पदार्थ असला तरी इतर ठिकाणी त्याचे वेगवेगळे रूप देखील आहे. कोणी मिसळीचा स्वाद ब्रेड सोबत घेतो तर कोणी कडक शेव टाकून खातो.

misal pav

प्रत्येकाने घेतलाय मिसळचा स्वाद

मिसळ पावचा स्वाद प्रत्येकाने घेतला आहे. शहर असो वा गाव खेडा प्रत्येक मराठी माणसाने मिसळीचा आस्वाद घेतला आहे. आपला हाच पदार्थ जगात लय भारी ठरला आहे. देशातील सर्वात चांगल्या शाकाहारी पदार्थांमध्ये मिसळ पावला स्थान मिळाले आहे.

कोणी केला निकाल जाहीर

TasteAtlas या वेबसाईटने मिसळीचे वैशिष्ट्य दिले आहे. मग या वेबसाईटने तिला जगातील ११ व्या क्रमांकाचे सर्वोत्तम शाकाहारी खाद्य पदार्थ म्हटला आहे. मिसळ पाव कधी नाष्ट्या म्हणून खातात तर कधी जेवण म्हणून देखील खाल्ली जाते. तिच्यासाठी कोणतेही वेळेचे बंधन नाही. सकाळ असो वा संध्याकाळ खाणाऱ्याचे पोट मात्र मिसळ पावमुळे भरते. मिसळ पावची लोकप्रियता इतकी आहे की अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात मिसळच्या छोट्या गाड्यापासूनच सुरु केलीय.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.