पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी आमदार अश्विनी जगताप यांचा पुढाकार

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदार आश्विनी जगताप यांनी पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीचा प्रश्न सभागृहात मांडला. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो, हिंजवडी ते चाकण मेट्रो मार्गाचा प्रकल्प अहवाल यावर त्यांनी चर्चा केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी आमदार अश्विनी जगताप यांचा पुढाकार
अश्विनी जगताप
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 9:18 AM

पुणे : पिंपरी चिंचवडमधील नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभेत शहरातील वाहतुकीसंदर्भातील प्रश्न उपस्थित केला. शहरात मेट्रोचे जाळे तयार करण्याची मागणी त्यांनी केली. नाशिक फाटा ते चाकण आणि पिंपरी ते निगडी या दोन मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यासाठी सर्व संबंधित विभागांची बैठक बोलवण्याची मागणी त्यांनी केली. नाशिकफाटा-चाकण मेट्रो आणि पिंपरी-निगडी मेट्रो मार्गाची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. परंतु अजूनही त्यात प्रगती झाली नसल्याचे अश्विनी जगताप यांनी सांगितले.

काय केली मागणी

पिंपरी चिंचवडीमधील वाहतुकीच्या प्रश्नांवर आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभेत सांगितले की, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाप्रमाणेच पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या हिंजवडी ते चाकण मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. हा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसमावेशक आराखड्यात या मेट्रोची शिफारस करण्याचे सांगितले होते. तसेच हिंजवडी ते चाकण असा ३०.८ किलोमीटर अंतरावर मेट्रो मार्ग विकसित करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले होते.

हे सुद्धा वाचा

या प्रकल्पास मंजुरी मिळावी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सूचनेनुसार हिंजवडी ते चाकण या मेट्रो मार्गाचा महामेट्रो ते नाशिक फाटा ते चाकण (मोशी मार्गे) या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र शासनाकडून तयार करण्यात यावा, अशी मागणी अश्विनी जगताप यांनी केली. शहरातील वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी महामेट्रोच्या पिंपरी ते निगडी या संपूर्ण 4.5 किमीच्या एलिव्हेटेड ट्रॅकच्या प्रकल्पास मान्यता मिळून तीन वर्षे झाली आहे. त्यानंतरही हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. त्यास मंजुरी मिळावी, अशी मागणी अश्विनी जगताप यांनी केली.

जगताप पोटनिवडणुकीत विजयी

पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्या निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी आला. त्यात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा पराभव केला होता. अश्विनी जगताप यांचा ३६,०९१ मतांनी मोठा विजय झालाय. त्यांना एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाली. महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मतं मिळाली आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.